सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | एसकेडी चॅरिटेबल ट्रस्ट संचलित, भावडे येथील व्ही.के.डी. इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल नुकताच प्रसिद्ध झाला. यशाची परंपरा कायम राखत याही वर्षी विद्यालयाचा बारावी विज्ञान शाखेचा निकाल शंभर टक्के लागला. विद्यालयात श्रेयस धनराज सोनवणे 88.50% गुण मिळवून प्रथम, सानिका पवार, सुविज्ञा पवार ८०.८३ टक्के अनुक्रमे द्वितीय, तर सानिया पवार 78.67% गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शिक्षक नितीन राऊत, अनिल भालेराव, तुषार नीलख, साबळे जे.के, किशोर धोंडगे, निकम प्रियंका, सोनवणे आर.के, आर. बी. अहिरे, वाय. एस. आहेर, हेमंत शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.
Deola | आहेर महाविद्यालयाचा निकाल १०० टक्के; विज्ञान शाखेत वेदांत पाटील प्रथम
प्राचार्य एन.के. वाघ, संस्थेचे अध्यक्ष संजय देवरे, सचिव मीना देवरे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांना जेईई, नीट, एमएचटी, सीईटी विविध स्पर्धा परीक्षांच्या बाबतीत अधिकाधिक मार्गदर्शनासाठी तज्ञ मार्गदर्शकांच्या उपस्स्थितीत शिबिरांचे आयोजन विद्यालयामार्फत केले जाते. अशी माहिती प्रचार्य एन.के.वाघ यांनी दिली. तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संस्थेच्या मार्फत दर्जेदार शिक्षण व सर्व सुख सुविधा पुरवून त्यांचा सर्वांगीण विकास घडवून, एक सक्षम नागरिक घडविण्याचा संस्थेचा मानस असल्याची माहिती यावेळी संस्थेचे अध्यक्ष संजय देवरे यांनी दिली.
Deola | खर्डे विद्यालयाचा कला शाखेचा निकाल ८७.०३%; यामिनी शिंदे प्रथम
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम