Deola | नाशिकच्या देवळा तालुक्यातील मेशी या गावात सर्वपक्षीय पदाधिकारी तसेच कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदीच्या धोरणा विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी शासन निर्णयाची होळी करत निषेध व्यक्त केला.
याप्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नाशिक जिल्हा अध्यक्ष राजू शिरसाठ तसेच शेतकरी संघटनेचे युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष तुषार शिरसाठ यांनी उपस्थित शेतकऱ्यांना संबोधित करताना सांगितले की, “केंद्र शासन हे नेहमीच शेतकऱ्यांच्या विरोधात भुमिका घेत असते. आधीच दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली असतानाच, जेमतेम पाण्यावर कसेबसे कांदा पिक आले.
Onion Export | पिंपळगावला कांदा लिलाव सुरू; असा मिळतोय भाव
अशातच केंद्र शासनाने कांदा निर्यात बंदी लागू करून कांद्याचे बाजारभाव पाडून सरकारने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. यामुळे हा निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा. अन्यथा शेतकरी यापुढे मोठे आंदोलन करून केंद्राच्या विरोधात लढा उभारतील असा इशाराही देण्यात आला.
कसमादेचे तिन्ही हंगामातील प्रमुख पिक हे कांदाच असुन, सर्व आर्थिक उलाढाल ही या पिकांवर अवलंबून आहे. यावेळी शिवसेना उबाठा गटाचे पदाधिकारी तसेच उपसरपंच सतीश बोरसे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शिरसाठ, ग्रामपंचायत सदस्य तुषार शिरसाठ, विकास सोसायटीचे संचालक भिला आहेर, दत्तू चव्हाण, प्रविण शिरसाठ, राकेश आहेर, सुभाष बोरसे, प्रविण बोरसे, मुरलीधर आहिरे, सतीश देवरे, साहेबराव आहेर आदींसह अनेक ग्रामस्थ, तसेच कांदा उत्पादक शेतकरी हे मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Onion news | केंद्र सरकार कांदा उत्पादकांना ‘गुड न्यूज’ देईल; दिल्लीत मोठी बैठक
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम