सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : Deola | चांदवड-देवळा तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा यासाठी देवळा तालुका राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने तालुकाध्यक्ष दिनकर निकम यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी (दि. ४) पासून आमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी अनेक नागरिकांनी उपोषण स्थळी भेट देऊन आपला पाठिंबा जाहीर केलेला आहे.
Breaking News । एकनाथ खडसेंना हृदयविकाराचा झटका; तातडीने मुंबईला हलविणार
उपोषणाच्या सलग दुसऱ्या दिवशी देवळा तालुक्यातील तसेच चांदवड तालुक्यातील अनेक मान्यवरांनी उपोषण स्थळी भेट देऊन उपोषणाला पाठिंबा जाहीर केला आहे. यावेळी माजी आरोग्य मंत्री डॉ. शोभा बच्छाव, राष्ट्रवादी काँग्रेसचे चांदवड तालुका अध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. बीनूतन आहेर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुनील आहेर, काँग्रेसचे सटाणा तालुका अध्यक्ष किशोर कदम, पिंपळगाव वाखारीचे सरपंच नदीश थोरात, दलित मित्र भाऊराव अहिरे, खामखेडाचे सरपंच वैभव पवार, वसंत सूर्यवंशी, कैलास सूर्यवंशी, राज आहेर, संभाजी शेजवळ, गोविंदा सोनवणे, वंदना सोनवणे, मनोज पवार, अण्णा मोरे, जिभाऊ वाघ, समाधान गुंजाळ, तात्या खैरनार, लक्ष्मण निकम, नीलिमा आहेर, वैशाली ठोंबरे, तेजस देवरे, हरिश्चंद्र गवळी, रामदास आढाव, प्रदीप आहेर, उमाकांत पाटील, बाळू शिंदे आदींसह बहुसंख्य नागरिकांनी आंदोलन स्थळी भेट देऊन उपोषणाला पाठिंबा दिलेला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम