Deola | देवळा येथील आहेर महाविद्यालयात ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ साजरा

0
31
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा |  येथील कर्मवीर रामरावजी आहेर महाविद्यालयातील मराठी विभाग व विद्यार्थी विकास मंडळ आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवडा मंगळवार (दि.२३) रोजी साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कवी व गझलकार देवदत्त बोरसे उपस्थित होते. यावेळी त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची झालेली सद्यस्थिती, भाषेबद्दलची स्थिती, दर बारा किलोमीटरवर भाषा कशी बदलते, विद्यार्थ्यांचे लाजाळूपण यावर त्यांनी मार्गदर्शन केले.(Deola)

गुणवत्ता वाढली की, शब्द ही विकता येतात असेही त्यांनी सांगितले. गुणवत्ता वाढवण्यासाठी वाचनाची कास धरावी. तसेच त्यांनी आपली ‘माझा मित्र’ही गझल गाऊन विद्यार्थ्यांना मित्राचे आयुष्यातील स्थान सांगितले. मित्र म्हणजे व्यक्त होण्याचे ठिकाण असून, गणित सोडवण्यासाठी जशी सूत्रांची आवश्यकता असते त्याचप्रमाणे आयुष्यातील गणित सोडवण्यासाठी मित्र असावे लागतात.

Deola | खर्डेत राम, लक्ष्मण, सीताच्या वेषभूषेत चिमुकल्यांची फेरी

यात आई, बाप आणि मित्राचे महत्त्व आपल्या कविता आणि गझल च्या माध्यमातून सांगितले.कविता मांडली जाते तर गजल प्रसवते. त्यांची-“ओस पडले गाव देवा, वैभवाचा काळ नाही, प्रेम धागे गुंफलेले एकतेचे जाण नाही” ह्या गजलची ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात जवळपास ७०० गझलकारातून निवडली केली गेली. बोरसे यांनी अशा वेगवेगळ्या गझल सादर करुन वातावरण मंत्रमुग्ध केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी उपप्राचार्य प्रमोद ठाकरे होते. तर प्रास्तविक व स्वागत प्रा. रवींद्र पगार यांनी केले. यावेळी उपप्राचार्य बी.के.रौदळ आदींसह सर्व ज्ञानशाखांचे विभागप्रमुख व सहकारी प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार प्रा. डॉ. स्वप्निल गरुड यांनी मानले.(Deola)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here