सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | “ग्रामीण भागातून येऊन नाशिक सारख्या जिल्ह्याच्या ठिकाणी देवळा मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेची शाखा सुरू करून तिला भरभराटीस आणण्यासाठी संस्थेच्या संचालक मंडळाने जी सभासदांमध्ये विश्वासार्हता निर्माण केली आहे. ती वाखाणण्याजोगी असून, या बँकेत महिला अध्यक्ष असल्याने बँक नक्कीच उत्तुंग भरारी घेईल” असे प्रतिपादन आमदार सीमा हिरे यांनी केले. देमको बँकेच्या उत्तम नगर, नाशिक येथील शाखेच्या नवीन जागी शनिवारी (दि.२४) रोजी स्थलांतर झाले. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.
Deola | देमको बँकेस आर्थिक वर्षाच्या अखेरीस २ कोटी ८६ लाख ७५ हजार रुपयांचा नफा
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे उत्पादन शुल्क आयुक्त, मुंबई डॉ. विजय सूर्यवंशी, आमदार सुनील ढिकले, नगरसेविका रत्नमाला राणे, विश्वास ठाकूर हे होते. यावेळी बोलताना आमदार सौ. हिरे पुढे म्हणाल्या की, “केंद्र सरकारने महिला सक्षमीकरणासाठी ठोस पावले उचलले असून, देशाच्या सर्वोच्च पदापासून ते देशाच्या अर्थ मंत्रालयापर्यंत महिला काम पाहत आहेत. महिलांचा सहभाग प्रत्येक क्षेत्रात वाढून महिलांचे सामर्थ्य वाढविण्याचे काम केंद्र व राज्य सरकार करीत आहे दे.म.को. बँकेच्या अध्यक्षा प्रथमच महिला झाल्याचे समजले आणि आपल्या कारकिर्दीत त्यांनी अडचणीत असलेल्या संस्थेला बाहेर काढून आज प्रगतीच्या शिखरावर पोहचवल्याचा मला मनस्वी आनंद झाला आहे”, असे त्या म्हणाल्या.
Deola | दि देवळा मर्चंटस् को. ऑप. बँकेच्या नाशिक शाखेचे स्थलांतर व उद्घाटन सोहळा
यावेळी उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले की, “मी ज्या भूमीत जन्मलो तेथून ही बँक आली व आज तिची प्रगती पाहता मी या बँकेचा सभासद असल्याचा मला निश्चित अभिमान आहे”. यावेळी सहायक निबंधक संजय गीते, देवळा बाजार समितीचे संचालक भाऊसाहेब पगार, बालाजी पतसंस्थेचे अध्यक्ष पवन अहिरराव, नितीन शेवाळकर, उद्योजक कौतिक पवार, राजेंद्र वडनेरे आदींसह व्हा. चेअरमन डॉ. प्रशांत निकम, जनसंपर्क संचालक योगेश वाघमारे, भारत कोठावदे, राजेंद्र सूर्यवंशी, जयप्रकाश कोठावदे, केदारनाथ मेतकर, हेमंत अहिरराव आदी संचालक व सभासद, ठेवीदार, ग्राहक, मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील भालेराव, व्यवस्थापक नितीन बोरसे आदी कर्मचारी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम