सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | जिल्ह्यातील सेतू संचालकांनी एकदिवशीय बंद पुकारल्याने देवळा तालुक्यातही सोमवार (दि. 8) जुलै रोजी सेतू व महा ई-सेवा केंद्रांचे काम बंद ठेवण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या महत्वकांक्षी “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या योजनेत सेतू संचालकांना ठरविलेले सेवा शुल्क निश्चित करावे, प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे सेवा शुल्क अतिशय कमी असून त्यात वाढ करावी, प्रलंबित मागील सेवा शुल्क अदा करावे, पीक पाहणीची सक्ती करण्यात येऊ नये, उत्पन्न दाखले मिळण्यासाठी अर्जदाराने केलेल्या स्वघोषणा पत्रावर सेतू संचालकांच्या सहीची अट घालण्यात आली असून ती अट रद्द करावी अशा अनेक मागण्यांचे निवेदन सेतू केंद्र महा ई-सेवा केंद्र व सीएससी केंद्र चालकांनी देवळ्याचे तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी यांना दिले. यावेळी आबा खैरनार, विशाल मराठे, चंद्रशेखर सोनारे, यशवंत देवरे, योगराज पाटील, योगेश वाघ, निलेश जाधव, वैभव केदारे, मछिंद्र महिरे, प्रतीक धामणे, जयवंत पाटील, आदिनाथ ठाकूर आदींसह तालुक्यातील केंद्रचालक उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम