सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | देवळा शहरात मंगळवारी (दि. २) रोजी भरदिवसा गर्दीचा फायदा येऊन अज्ञात चोरट्यांनी पाळत ठेवत दुचाकीवरून १९ हजार रुपयांची पिशवी लंपास केल्याची घटना समोर आली आहे. देवळा शहरात सध्या अनेक चोरीच्या घटना घडत असून, या गुन्हेगारांना शोधण्याचे देवळा पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, देवळा येथील सेवानिवृत्त शिक्षक दादाजी दगा आहेर यांनी मंगळवारी (दि. २) रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास तासबा मेडिकलसमोर आपली दुचाकी लावून बस स्थानक समोरील बँक ऑफ बडोदा शाखेतून २० हजार रुपये काढून पिशवीत ठेवले. यानंतर त्यांनी बँकेलगत असलेल्या शरदराव पवार पतसंस्थेत या पैशातून एक हजार रुपये वीज बिल भरणा करून खाली उतरले. त्यांनी दुचाकीला पैशांची पिशवी लावून घराकडे निघताच अज्ञात चोरटयांनी आहेर यांना तुमच्या अंगावर पाठीमागे घाण असल्याचे सांगितले.
Deola crime: देवळा शहरात चोरटे पुन्हा ‘ॲक्टिव्ह मोडवर’ ; एका रात्री चार घरफोड्या
Deola Crime | दुचाकीवरून खाली उतरले अन् पैशांची पिशवी गायब
त्यांनी असे सांगिल्यानंतर आहेर हे आपल्या कपड्यावर पडलेली घाण साफ करण्यासाठी दुचाकीवरून खाली उतरले आणि काही क्षणातच चोरट्यांनी दुचाकीला असलेली पैशांची पिशवी घेऊन पळ काढला. यानंतर आहेर यांनी आपल्या दुचाकीला पिशवी दिसत नसल्याने लक्षात आल्यावर सदर पिशवी शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत चोरटे त्यांना गुंगारा देत फरार झाले होते. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून, दादाजी आहेर यांनी या घटनेबाबत देवळा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
हि घटना समजताच पोलिसांनी बस्थानाकासमोर असलेल्या काही दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासून माहिती घेतल्याचे समजते. सध्या खरीब हंगामाची लगबग सुरु आहे. केंद्र सरकारने पीएम किसान योजनेचे शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग केल्याने देवळा शहरातील सर्वच राष्ट्रीयकृत बँकांमध्ये पैसे काढण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून येत असून, याचा फायदा आता भुरट्या चोरांनी घेतला आहे. देवळा शहरात अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पुढील तपास प्रभारी पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.
Deola | गिरणा नदी पात्रातून अधिकाऱ्यांच्या मेहरबानीने वाळू तस्करी; ग्रामस्थांचे गंभीर आरोप
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम