Deola | प्रवाशांची लूट करून पळणाऱ्या चोरट्यांना देवळ्यातील युवकांनी पकडले

0
64
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | प्रवाशांची लूट करून पळून जाणाऱ्या आरोपींना जागरूक नागरिकांनी सिनेस्टाईल पाठलाग करून पकडले. यात युवकांनी सहकार्य केल्याने या चारही आरोपींना देवळा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. नंतर हा गुन्हा मालेगाव हद्दीत झाल्याने सदर संशयित आरोपींना मालेगाव पोलिसांकडे वर्ग करण्यात आले.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, टाकळी (ता. मालेगाव) येथील रामदास शेवाळे हे पत्नी समवेत सौंदाणे (ता. मालेगाव) येथून नाशिकला जाण्याच्या तयारीत असताना त्यांनी मारुती इको गाडी (GJ २६ AB ४१९३) ला हात दिला आणि ते या गाडीत बसले.

थोड्या अंतरावर गेल्यावर या गाडीतल्या इसमांनी त्यांच्याकडून १४ हजार रुपये व इतर ऐवज काढून घेतला व त्यांना उतरून देत गाडी परत मालेगावकडे वळवली. दरम्यान, यावेळी शेवाळे यांनी प्रसंगावधान दाखवत झालेला प्रकार मुंगसे येथील डॉ. प्रशांत सूर्यवंशी यांना फोनवर कळवला. डॉ. सूर्यवंशी यांनी गावातील युवा कार्यकर्त्यांना सोबत घेत सदर गाडी मुंगसेजवळ अडवण्याचा प्रयत्न केला. परंतु, अतिवेगामुळे ते शक्य झाले नाही.

Deola | पिंपळगाव येथील मोदींच्या सभेसाठी जिल्हाभरातून हजारो कार्यकर्ते उपस्थित राहणार

हार न मानता येथील डॉ. सूर्यवंशी, पंकज शेवाळे, सागर सयाजी, निलेश दामू, दर्शन शिवाजी, योगेश भामरे, प्रकाश सूर्यवंशी, जयेश सूर्यवंशी तसेच मेशी येथील सरपंच बापू जाधव, शरद सूर्यवंशी, मोहन बोरसे, प्रवीण शिरसाठ यांनी इतर वाहनांच्या साहाय्याने पाठलाग करत पाटणे, महालपाटणे, मेशी या गावांमध्ये ही गाडी पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु ते वेगवेगळे मार्ग धरत असल्याने व वेग खूप असल्याने ते आव्हानात्मक झाले होते. पण तरीही यावर मात करत या आरोपींना त्यांना देवळा मार्गावर पकडण्यात यश आले असून, संपूर्ण तालुक्यातून या युवकांचे कौतुक करण्यात येत आहे. या गुन्हात एकूण चार आरोपी असून देवळा पोलिसांनी त्यांना मालेगाव पोलीस ठाण्यात वर्ग केले आहे.

Deola | देवळा पोलिसांची माहिती सांगण्यास उदासीनता – 

याबाबत संबंधित आरोपींना देवळा पोलीस ठाण्यात जवळपास तीन ते चार तास ठेवण्यात आले होते. त्यानंतर त्यांना मालेगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. वृत्तपत्रांच्या प्रतिनिधिंनी देवळा पोलिसांशी संपर्क साधून घटनाक्रम, आरोपींची माहिती व नावे विचारली असता अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी एकमेकांची नावे दाखवत माहिती देण्यास टाळाटाळ केली. यामुळे देवळा पोलिसांबाबत साशंकता निर्माण झाल्याने सदर घटनाक्रम व इतर माहिती मालेगाव येथून मिळवावी लागली.

Deola | देवळ्याचे व्याही चंद्रशेखर बावनकुळे यांची देवळा भेट


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here