Deola | दहिवड येथील चोर चावडी धबधब्यावर मालेगावच्या तरुणाचा बुडून मृत्यू

0
88
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | दहिवड येथील चोर चावडी धबधब्यावर मालेगाव येथील एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला असून, या घटनेची देवळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, गुरुवार (दि.१२) रोजी दुपारच्या सुमारास मालेगाव येथील काही हौशी तरुण हे देवळा तालुक्यातील दहिवड व चिंचवे गावाच्या हद्दीवरील चोरचावडी धबधब्यावर पावसाळी पर्यटनासाठी आले होते. त्यातील काही तरुण हे धबधब्याजवळील डोहात पोहण्याचा आनंद घेत असताना राहुल सोमनाथ काळे (वय १८ रा. गवळीवाडा, मालेगाव कॅम्प) याला पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने त्या ठिकाणी तो बुडाला.

Deola | ऐन पावसाळ्यातही देवळा तालुक्यातील पूर्व भागातील गावांना पाण्याची प्रतीक्षा

सदर घटनेची माहिती त्या तरुणाच्या नातेवाईकांना व देवळा पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी हजर होत तरुणाला शोधण्यासाठी शोधकार्य सुरू केले. सायंकाळी उशिरा सात वाजेच्या सुमारास मालेगाव येथील अग्निशमन दलाचे जवान व स्थानिकांना सदर तरुणाचा मृतदेह धबधब्याजवळील डोहात आढळून आला. सदर मृतदेह मालेगाव येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आल्याची माहिती देवळा पोलिसांकडून देण्यात आली असून, पोलीस उपनिरीक्षक कैलास गुजर, पोलीस नाईक योगेश जामदार व त्यांचे सहकारी हे पुढील तपास करीत आहेत. गुरुवारी (दि.१२) रोजी घडलेल्या या घटनेमुळे मागील चार वर्षांपूर्वी याच ठिकाणी वडाळीभोई येथील ३ तरुण पाण्यात बुडून मृत्यू झाल्याच्या घटनेची स्थानिकांना आठवण झाली.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here