सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | ६ डिसेंबरच्या रात्री तालुक्यातील मेशी येथील सेवानिवृत्त वीजवितरण कंपनीचे कर्मचारी बन्सीलाल कदम हे गेल्या आठ दिवसांपासून घराला कुलूप लावून मोठ्या मुलाकडे पुण्याला गेले होते.
घरी कोणी नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत घरातील व कपाटातील सर्व सामान अस्ताव्यस्त केले. मात्र कदम यांच्या घरात काहीच न सापडल्याने चोरट्यांचा डाव फसला. योगायोगाने कदम यांचे मोठे पुत्र हे पुण्याहून मेशी येथे सकाळी नऊ वाजता पोहोचले असता त्यांनी बघितले तर घराला कुलुपच नव्हते. त्यांनी घरात प्रवेश केला तर सर्व सामान अस्ताव्यस्त होते.
तेव्हा आपल्या घरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी देवळा पोलीस ठाण्यात भ्रमणध्वनी वरून माहिती दिली. यानंतर पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव व त्यांची टीम घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी पंचनामा केला असून अज्ञात चोरट्यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता 2023 नुसार कलम 331(3), 331(4), 305, 62 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बर्डे, चौधरी करत आहेत.
Deola | कणकापूर विकास सोसायटीच्या चेअरमनपदी कडू शिंदे यांची बिनविरोध निवड
विशेष म्हणजे कदम यांचे लहान पुत्र निकेतन कदम हे नागपूर शहराचे सहाय्यक पोलीस आयुक्त आहेत आणि त्यांच्याच घरी चोरी होणे याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. दुपारनंतर घटनेचा तपास जलदगतीने व्हावा म्हणून नाशिक येथील श्वानपथक व अंगुलीमुद्रा यांना पाचारण करण्यात आले होते. दरम्यान, दुसऱ्या एका घटनेत मेशी गावालगत असलेल्या देवपूरपाडे येथील प्राथमिक शिक्षक सुभाष देवरे यांच्या बंद घराचे कुलूप तोडत चोरट्यांनी दहा तोळे सोने व 1 लाख 75 हजार रुपये रोख रक्कम असा ऐवज लांपस केला असून यामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी परिसरातून होत आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम