Deola | देवळ्यात वारंवार चोरीच्या घटना; तीन ते चार ठिकाणी चोरी, रोख रक्कम, दुचाकी लंपास

0
69
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा |  देवळा येथील ज्ञानेश्वर नगर (वाखारी रोड) येथे झालेल्या धाडशी घरफोडीचा प्रकार ताजा असताना रविवारी (दि.४) रोजी पुन्हा शहरातील शिवाजी नगरमध्ये बंद घराचा कडी कोयंडा तोडून चोरीचा प्रकार घडल्याने नागरिकांचा सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्याच मध्यरात्री अजून तीन ते चार ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी आपला मोर्चा वळवून यात चार दुचाकी लंपास केल्याची घटना घडली आहे.

यात मोतीनगरमध्ये राहणारे शरद आहेर यांची स्प्लेंडर मोटरसायकल सोमवारी (दि.५) रोजी सकाळी ६ वाजता चोरीस गेली असून, चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहेत. गेल्या दोन महिन्यांपूर्वीच शरद आहेर यांच्या शेतातून ट्रॅक्टर व ट्रॉलीची चोरी झाली आहे. याचा छडा अद्याप लागलेला नाही. देवळा पोलिसांत या घटनांबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Deola | देवळ्यातील अजब चोरीची चर्चा; रात्री चोरी अन् पहाटे चोराने आधारकार्ड, पासबुक परत केले

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, देवळा शहरातील शिवाजी नगरमध्ये राहणारे सेवानिवृत्त शिक्षक शंकर विश्वनाथ आहेर हे सपत्नीक नाशिकला गेल्याने अज्ञात चोरट्यांनी घर बंद असल्याचा फायदा घेत रविवारी दि.४ रोजी रात्री कडी कोयंडा तोडून घरात कपाटातील समान अस्ताव्यस्त करत रोख पंधरा हजार रुपये व काही मौल्यवान वस्तू चोरून नेल्या असल्याची माहिती आहेर यांनी पोलिसांना दिली आहे.

त्याच बरोबर परिसरात तीन ते चार ठिकाणी या अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याचा प्रकार घडला असून यातील एकाची दुचाकी चोरून नेल्याची घटना घडली आहे. यामुळे उपनगरात राहणाऱ्या ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, देवळा शहरात गेल्या महिन्यात धाडशी घरफोडी झाली असून, पोलिसांनी या भामट्याला नंदुरबारमध्ये पकडून अटक केली आहे. मात्र ही घटना ताजी असताना पंधरा दिवसांनी पुन्हा चोरीचे प्रकार घडल्याने देवळा पोलिसांसमोर या अज्ञात चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आव्हान उभे ठाकले आहे.

Deola | देवळा तालुक्यात दारूच्या नशेत मित्रानेच केला मित्राचा घात


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here