
देवळा : देवळा येथील कर्मवीर रामरावजी आहेर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेना विभागातील विद्यार्थी कॅडेट तेजस जाधव ला धावण्याच्या स्पर्धेत सुवर्ण पदक मिळाले असून,या कौतुकास्पद कामगिरीचे जाधव याचे सर्वस्तरावरून कौतुक होत आहे.
Malegaon | ‘जवान’च्या शो दरम्यान मालेगावच्या चित्रपटगृहात फटाक्यांची आतिषबाजी
महाराष्ट्र निर्देशालय यांच्याकडून नांदेड मध्ये नुकते बेसिक लीडरशिप शिबिर दि.२७ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर दरम्यान १० दिवसांचे शिबिर आयोजित करण्यात आले होते. यामध्ये महाराष्ट्रातील ७ ग्रुपचा समावेश होता. त्यामध्ये मुंबई (अ), मुंबई (ब), कोल्हापूर, पुणे, रत्नागिरी, औरंगाबाद, नागपूर,अमरावती या ग्रुपचे एकूण ३८६ विद्यार्थी सहभागी झाले होते.

या शिबिरामध्ये देवळा महाविद्यालयातील कॅडेट तेजस जाधव हा विद्यार्थी सहभागी झाला होता. शिबिरात चारित्र्य निर्माण, नेतृत्वगुणांचा विकास, व्यक्तिमत्व विकास, संवाद कौशल्य, स्वच्छ भारत अभियान आणि रक्तदान असे विविध उपक्रम राबविण्यात आले.कॅडेट्सना कवायती, नेमबाजी आणि नकाशा वाचन इत्यादींचे लष्करी प्रशिक्षण देण्यात आले. , वादविवाद, सांस्कृतिक आणि क्रीडा, निबंध स्पर्धा आदी उपक्रमांचे आयोजनही केले होते .
देवळा महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेना अधिकारी लेफ्टनंट बादल लाड यांनी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ७ महाराष्ट्र बटालियन एनसीसी नाशिकचे कमांडिंग ऑफिसर कर्नल तरुण खन्ना व प्रशासकीय अधिकारी लेफ्टनंट कर्नल रवी व्यास यांनी कॅडेट जाधव यांची जिल्हास्तरावर निवड स्तरावर केली.
या यशाबद्दल तेजस जाधव याचे प्राचार्य हितेंद्र आहेर, प्रशासकीय अधिकारी डॉ. मालती आहेर, सचिव.पी. टी.पवार ,उपप्राचार्य पी. एन.ठाकरे, कार्यालयीन अधीक्षक दिनेश वाघमारे यांचे सह शिक्षकांनी अभिनंदन केले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम