सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देवळा तालुक्यातील महायुतीच्या कार्यकर्त्यांना दिंडोरी लोकसभेच्या भाजपच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी देवळा येथील सदिच्छा भेटी प्रसंगी केले.(Deola)
धुळे लोकसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांचा प्रचार आटोपून चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी (दि. १२) रोजी सायंकाळी पाच वाजता देवळा येथील आपले व्याही राजेंद्र विष्णू पवार यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी विष्णू आनंदा पवार यांनी त्यांचा सपत्नीक सत्कार केला. राजेंद्र पवार यांची मुलीचा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाशी विवाह झाला असून, बावनकुळे हे देवळ्याचे व्याही आहेत. यामुळे बावनकुळे यांची ही पहिलीच भेट देवळा काल झाली.(Deola)
Deola | देवळा येथे दुर्गा माता यात्रोत्सवाला सुरुवात; पावसाने वाढवली यात्रेची शोभा
यानंतर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी बावनकुळे यांची भेट घेतली असता त्यांनी दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेऊन भाजप उमेदवार डॉ. भारती पवार यांना विजयी करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी भाजपचे जिल्हा नेते केदा आहेर, माजी जिल्हाध्यक्ष दादा जाधव, नगरसेवक जितेंद्र आहेर, तालुका अध्यक्ष अतुल पवार, गटनेते संभाजी आहेर आदींसह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.(Deola)
Deola | देवळा येथील जिजामाता कन्या विद्यालयातील विद्यार्थिनींचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम