Deola | देवळ्यात भगरे समर्थकांनी उधळला गुलाल

0
18
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा |  दिंडोरी लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांच्या विजयानंतर देवळा येथील पाच कंदील परिसरात आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच भगरे यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करत फटाक्यांच्या आतषबाजी करत जल्लोष केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष पंडितराव निकम, मविप्रचे संचालक विजय पगार, माजी संचालक डॉ. व्ही. एम. निकम, दिलीप पाटील, चिंतामण आहेर, जि. प.च्या माजी सभापती उषाताई बच्छाव, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सह संपर्कप्रमुख विजय जगताप, शहराध्यक्ष विश्वनाथ गुंजाळ, देवा चव्हाण, सोमनाथ शिंदे, काँग्रेसचे दिलीप आहेर, अरुणा खैरनार, नगरसेविका यश्वर्या आहेर, पंचायत समितीच्या माजी सभापती लक्ष्मीबाई शेवाळे, समाजी आदींसह रवींद्र जाधव, सचिन सूर्यवंशी, महेंद्र आहेर, पी.डी. निकम, संजय सावळे, निखिल आहेर, संदीप पाटील, सतिष आहेर, विलास शिंदे, सतीश सूर्यवंशी, कैलास कोकरे, मयूर सोनवणे, गणेश आहेर, राजेंद्र आहेर, नंदलाल निकम, शांताराम पवार आदी पदाधिकारी व समर्थक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here