सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | देवळा नगरपंचायत हद्दीतील विधवा महिलांना उदरनिर्वाहासाठी आधार योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभ दिला जाणार असून, खालील अटी शर्ती पुर्ण करणा-या पात्र विधवा महिलांकडून दि. ३० एप्रिल २०२५ पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे. यासाठी पात्र लाभार्थी महिला ही १८ ते ५० वर्षे वयोगटातील असावी, लाभार्थी महिला देवळा नगरपंचायत हद्दीतील रहिवासी असणे गरजेचे आहे.
Deola | देवळा नगरपंचायत हद्दीतील दिव्यांग बांधवांना वैयक्तिक आर्थिक सहाय्य
आवश्यक कागदपत्रे –
विहित नमुन्यातील अर्ज (नगरपालिकेच्या नागरी सुविधा केंद्रात मोफत मिळेल), पतीचा मृत्यु दाखल्याची प्रत, रहिवासी/पत्ता पुरावा (आधार/मतदान कार्ड/ड्रायव्हिंग लायसन्स/पासपोर्ट आदी.), वयाचा पुरावा (पॅन/जन्म दाखला/शाळा सोडल्याचा दाखला/१० वी किंवा १२ वी प्रमाणपत्र), राष्ट्रीयकृत बैंक पासबुक झेरॉक्स, स्वयंघोषणा पत्र (नगरपालिकेच्या नागरी सुविधा केंद्रात मोफत मिळेल). याबाबत सर्व माहिती देवळा नगरपंचायतीच्या नागरी सुविधा केंद्रात कार्यालयीन वेळेत मिळेल.
तरी पात्र लाभार्थी महिलांनी सदर योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगराध्यक्षा भाग्यश्री पवार, उपनगराध्यक्ष मनोज आहेर, मुख्याधिकारी प्रमोद ढोरजकर यांनी केले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम