Day special : अग्निप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आजचा दिवस साजरा केला जातो. आषाढ आमावस्या अर्थातच दीप अमावस्या. या दिवशी दिपपूजन केलं जाते. दिव्यामध्ये तेवणारी ज्योत अग्नी तत्वचे प्रतीक आहे. यामुळे अग्निप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आषाढ अमावस्या यादिवशी दीपपूजन केले जाते.
*गटारी नव्हे गतहारी अमावस्या*
श्रावणाआधी येणाऱ्या आमावस्येला ‘गतहारी’ अमावस्या असेच नाव आहे. गतहार हा शब्दच मुळात गत आणि आहार या दोन शब्दांपासून बनलेला आहे. गत याचा अर्थ इथे गेलेला किंवा त्यागलेला असा घेऊन त्यागलेला आहार. कालांतराने गतहारीचा अपभ्रंश होत सध्या या आमावस्येचे नाव गटारी अमावस्या असे झाले आहे.
दीप सूर्याग्निरूपस्त्वं तेजसां तेज उत्तम।
गृहाण मत्कृतां पूजां सर्वकामप्रदो भव ॥
अर्थ : हे दीपा, तू सूर्यरूप आणि अग्नीरूप आहेस. तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस. माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर.
यानंतर दिव्याची कहाणी ऐकतात. हे पूजन केल्याने ‘आयुरारोग्य आणि लक्ष्मी यांची प्राप्ती होते’, अशी फलश्रुती आहे.’ (संदर्भ : भक्तिकोश, चतुर्थ खंड, पृ. 877)
*आषाढ अमावस्येला काय करावे*
या दिवशी घरातील सर्व दिवे स्वच्छ धुऊन त्यांची मनोभावे पूजा करावी. प्रकाश आपल्या जीवनातील अंधार दूर करून आपल जीवन सुखमय करत असतो म्हणून त्याच प्रकाशा प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सण आहे. आजही महाराष्ट्रातील लाखो घरात दीप अमावस्या साजरी केली जाते. घरात असलेला गॅस, स्टोव्ह, ओव्हन, दिवे, ट्यूबलाईट, पंखा व इतर उपकरणांची पूजा करून त्यांना नैवेद्य दाखवला जातो.
*गटारी नव्हे आज दीप अमावस्या*
गेला काही वर्षांपासून दीपक अमावस्याला गटारी अमावस्या म्हणून संबोधलं जात आहे. दीप आमावस्येच्या दुसऱ्या दिवसापासून श्रावण महिना चालू होतो आणि हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याचं अलौकिक असं महत्व सांगितलं गेलं आहे. या महिन्यात असंख्य मांसाहार, मद्यप्राशन करण वर्ज करत असतात तर काहीजणांना चातुर्मास संपेपर्यंत मांसाहार किंवा मद्यपान करायला मिळणार असल्याने दीप अमावस्येच्या दिवशी मनसोक्त दारू पिली जाते आणि मांसाहार केला जातो. यामुळे दीप अमावस्येला गटारी अमावस्या या नावाने देखील संबोधलं जातं. अशी कृप्रथा गेल्या काही वर्षापासून उदयास आली आहे.
पश्चिमात्य संस्कृतीला जवळ करून आपण गटारी अमावस्या साजरी करायला शिकलो. मात्र परंपरागत चालत असलेली दीप अमावस्येची परंपरा आजही अनेक मराठी घरांमध्ये कायम आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम