मालेगाव | मानहानी प्रकरणात शिवसेना (उद्धव ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांना आज (दि. ४) मालेगाव अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने हजर राहण्याचे आदेश दिलेले होते. मात्र दोन वेळा ते न्यायालयात हजर न राहिल्यामुळे न्यायालयाकडून त्यांना आता पकड वॉरंट काढण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सूचनाही न्यायालयाने त्यांना दिलेल्या आहेत.
देवळा तालुका दुष्काळी जाहीर करावा या मागणीसाठी काँग्रेसचं आमरण उपोषण सुरू
मिळालेल्या माहितीनुसार, मंत्री दादा भुसे यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर अब्रुनुकसानीचा खटला दाखल केलेला आहे. या प्रकरणी आतापर्यंत त्यांना दोनदा न्यायालयात हजर राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या. मात्र दोन्ही वेळा खासदार राऊत गैरहजर राहिले.
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर गावबंदी करण्यात आल्याने न्यायालयात हजर राहणे शक्य नसल्याचा खसदार राऊत यांच्या वकिलाने न्यायालयात अर्ज दिला. परंतु न्यायालयाने तो अर्ज नामंजूर करत खासदार राऊत यांच्या विरोधात जामीनपात्र वारंट काढलेले आहे. तसेच पुढच्या तारखेला हजर न राहिल्यास पकड वारंट काढण्याच्या सूचनाही दिलेल्या आहेत.
२३ ऑक्टोबरला संजय राऊत यांना मालेगाव जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश दिलेले होते, मात्र दसरा मेळावा असल्याने गैरहजर राहण्याची परवानगी मिळावी, या आशयाचा विनंती अर्ज त्यांनी केला होता. त्यामुळे त्यांना आज (दि. ४) हजर राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या. मात्र आजही ते न्यायालयात हजर राहू शकले नाहीत.
नाशिक हादरलं! निफाडच्या तरुणाची लॉजमध्ये आत्महत्या; कारण समोर येताच पोलीस हादरले
नेमकं प्रकरण काय ?
मालेगाव येथील गिरणा कारखान्यात मंत्री दादा भुसेंनी यांनी 178 कोटींचा भ्रष्टचार केल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला होता. या बदनामीप्रकरणी दादा भुसेंनी संजय राऊत यांच्या विरोधात मालेगाव कोर्टात मानहाणीचा दावा दाखल केला. खासदार संजय राऊत यांनी काही महिन्यांपूर्वी मालेगावात झालेल्या सभेत मंत्री दादा भुसेंवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर दै. सामना या वृत्तपत्रातून दादा भुसे यांनी गिरणा सहकारी साखर कारखान्यात 178 कोटी रुपयांच्या शेअर्स घोटाळा केल्याचा आरोप केलेला होता. मात्र दादा भुसेंनी हे आरोप फेटाळून लावत राऊतांवर मालेगावच्या मा. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात मानहाणीचा खटला दाखल केलेला आहे. दै. सामना वर्तमानपत्रातून बदनामी केल्याचा मंत्री दादा भुसेंनी राऊतांवर आरोप केलेला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम