Dada Bhuse | खचून जाऊ नका सरकार तुमच्यासोबत; तातडीने पंचनामा करण्याचे मंत्री भुसेंचे निर्देश

0
108
Dada Bhuse
Dada Bhuse

नाशिक :  जिल्ह्यात अवकाळी आणि पूर्व मोसमी वादळाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यात देवळा तालुक्यातील उमराणे आणि तिसगाव येथे मोठी आर्थिक आणि जीवीत हाणी झाली असून, तिसगाव येथे वीज पडून एका तरुणाचा मृत्यू झाला असून, येथे शेड कोसळून देविदास अहिरे यांचे निधन झाल्याने परिसरात शोककळा पसरली. उमराणे येथील अनुप पवार यांच्याही कांदा शेडचे मोठे नुकसान झाले. पालकमंत्री दादाजी भुसे यांनी आज सकाळी येथील घटनास्थळी भेट देत कुटुंबीयांचे सांत्वन करत शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी तातडीने पंचनामा करून मदत पोहचविण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला दिले.

Dada Bhuse | खचून जावू नका सरकार शेतकऱ्यांसोबत 

यावेळी मंत्री दादाजी भुसे म्हणाले की, खचून जावू नका शेतकऱ्यांसोबत सरकार खंबीरपणे उभे आहे. नैसर्गिक आपत्तीचा सामना करू. यंत्रणेला सूचना दिली असून लवकरात लवकर मदत राज्य शासनातर्फे करण्यात येईल. वादळाचा अंदाज घेवून नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन देखील भुसे यांनी केले. शासकीय यंत्रणेला देखील सतर्क राहण्याचा सूचना केल्या आहेत.(Dada Bhuse)

Deola | मंत्री भूसेंमुळे आता ‘घोड्याची आडी’ अधिकृत; नागरिकांनी मांडले आभार

उमराणे येथील कांदा शेड कोसळून देवीदास भाऊराव अहिरे (वय ४०) या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. तर गायत्री सूरज देवरे (वय २२) व अभय अजय देवरे (वय साडे तीन वर्षे) हे जखमी आहेत. या वादळात उमराणे येथे बहुतांश कांदा शेड्स व घरांचे नुकसान आहे. या घटनेचे तातडीने पंचनामे करण्याची सूचना मंत्री दादाजी भुसे यांनी दिले आहेत.(Dada Bhuse)

दरम्यान, उमराणे व तिसगाव परिसरात रविवारी दुपारी झालेल्या वादळामुळे जीवित हानी आणि अनेक घरांचे पत्रे उडाल्याने आर्थिक नुकसान झाले असून, मुंबई आग्रा महामार्गावर अनेक झाडे उन्मळून पडली. यात वीजपुरवठा खंडित झाला आहे. प्रशासनाला यंत्रणा राबवून तातडीने वीजपुरवठा तसेच सर्व पूर्ववत करण्याची सूचना मंत्री भुसे यांनी दिली आहे. प्रशासकीय यंत्रणेसह आज मंत्री भुसे यांनी घटनास्थळी दाखल होत नुकसानाची पाहणी केली. या घटनेत तिसगाव येथील दोन व्यक्तींचा आकस्मित मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे. या कुटुंबीयांची भेट घेत त्यांनी सांत्वन केले. यावेळी चांदवड देवळा मतदार संघाचे आ. डॉ. राहुल आहेर हे देखील उपस्थित होते.

Nashik | रात्री गारपीट; सकाळी ८ वाजताच पालकमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here