Curbs on Onion Export: ही तर अघोषित निर्यातबंदीच…!; कांदा उत्पादक शेतकरी संतापला


Curbs on Onion Export: केंद्र सरकारने देशातून कांद्याच्या निर्यातीवर निर्बंध लादले आहेत. देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी आणि त्याच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. या अंतर्गत कांद्याच्या निर्यातीवर 40 टक्के भारी शुल्क लावण्यात आले आहे, जे या वर्षाच्या अखेरीपर्यंत लागू राहणार आहेत. या निर्णयाने शेतकरी चिडला असून सोशल मीडियावर नेटकर्यानी राळ उठवली आहे. या निर्णयाने कांद्याचे भाव कोसळण्याची शक्यता वाढली आहे. गेल्या चार ते पाच वर्षापासून कांदा कवडीमोल दराने विकला जात होता तेव्हा सरकार कुठे होते असा सवाल यावेळी शेतकरी करत आहेत. कांद्याला गेल्या पंधरा दिवसांपासून दर वाढला मात्र कांदा मोठ्या प्रमाणात सडला असून याकडे सरकार कधी लक्ष देणार असा संतप्त सवाल कांदा उत्पादकांनी केला आहे. (Curbs on Onion Export)

Weekly Horoscope : मेष, कर्क, धनु, मीन राशीसाठी हा आठवडा लकी असेल, जाणून घ्या साप्ताहिक राशीभविष्य

शुल्क वर्षाच्या अखेरीपर्यंत लागू राहील

केंद्र सरकारने शनिवारी संध्याकाळी कांद्याच्या निर्यातीवरील शुल्काबाबत अधिसूचना जारी केली. अधिसूचनेत म्हटले आहे की, सरकारने ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत कांद्याच्या निर्यातीवर ४० टक्के शुल्क लावण्याचा निर्णय घेतला आहे.(Curbs on Onion Export)

आधीच अंदाज लावला

टोमॅटोपाठोपाठ कांद्याचे भाव गगनाला भिडतील अशी भीती असताना सरकारने कांद्याच्या निर्यातीवर ही बंदी घातली आहे. सप्टेंबरपासून कांद्याचे भाव वाढण्यास सुरुवात होऊन सर्वसामान्यांना महागाईचे नवे धक्के बसतील, असे बोलले जात होते. ही भीती लक्षात घेऊन सरकार कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालण्यासाठी उपाययोजना करू शकते, असा अंदाज आधीच वर्तवण्यात आला होता. मात्र शहरी नागरिकांचा विचार करतांना शेतकऱ्यांचा मात्र विसर पडला आहे. (Curbs on Onion Export)

हेही सरकार करणार आहे

कांद्याच्या निर्यातीवरील बंदीमुळे देशांतर्गत बाजारपेठेत त्याची उपलब्धता कायम राहण्यास मदत होईल. देशांतर्गत बाजारपेठेत पुरेशी उपलब्धता असल्याने कांद्याचे भाव नियंत्रणाबाहेर जाण्याचा धोका कमी होईल. त्याच वेळी, देशांतर्गत पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी, सरकार बफर स्टॉकमधून कांदा सोडणार आहे.

मे महिन्यानंतर महागाई वाढू लागली

टोमॅटो, भाजीपाला आणि मसाल्यांच्या किमतीत आग लागल्याने मे महिन्यानंतर पुन्हा महागाई वाढू लागली आहे. जुलैमध्ये किरकोळ महागाईचा दर अनेक महिन्यांनंतर 7 टक्क्यांच्या पुढे गेला होता. अलीकडेच, रिझर्व्ह बँकेने आपल्या बुलेटिनमध्ये अशी भीती व्यक्त केली आहे की सप्टेंबर तिमाहीत किरकोळ चलनवाढ 6 टक्क्यांपेक्षा जास्त राहू शकते, जी तिची वरची मर्यादा आहे.

महागाईच्या या बदललेल्या ट्रेंडसाठी टोमॅटो विशेषतः जबाबदार मानला जात आहे, ज्याच्या किरकोळ किंमती देशातील बहुतेक शहरांमध्ये 200-250 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचल्या होत्या. अलिकडच्या आठवड्यात टोमॅटोचे भाव काहीसे कमी झाले आहेत.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Leave a Comment

Don`t copy text!