Nashik | बिजोरसे-नामपूर रस्त्यासाठी सव्वा कोटी मंजूर; रस्त्याचे काम सुरू

0
26

Nashik |  बिजोरसे – नामपूर फाटा ह्या रस्त्याच्या कामासाठी नाशिक जिल्हा परिषदेने १ कोटी २० लाख रूपये हे मंजूर केलेले आहेत. दरम्यान, लवकरच ह्या रस्त्याच्या कामालाही सुरुवात करण्यात येईल. अशी माहिती बिजोरसे येथील सरपंच राजेंद्र मोरे यांनी दिलेली आहे.

बिजोरसे ते नामपूर ह्या रस्त्याची अवस्था ही अत्यंत बिकट झालेली असून, ह्या रस्त्यावर मोठमोठे खड्डेही पडलेले आहेत. याठिकाणी अनेक छोटे मोठे अपघातदेखील घडत आहेत. मागील सहा महिन्यापूर्वीही सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यावर मुरूम टाकून या रस्त्याची डागडुजी केली होती. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही.

वाहनचालकांना या रस्त्यावरून प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने याकामाकडे तत्काळ लक्ष घालत ह्या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली होती.

Satara | वडिलांना लेकीचा अनोखा सलाम; रिक्षातून आणले स्वतःच्या लग्नाचे वऱ्हाड

मोराणे, मळगाव, इजमाने, कजवाडे, चिंचवे व अंबासन येथून शेतकऱ्यांना नामपूर येथे जाण्यासाठी ह्या रस्त्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे तातडीने या रस्त्याचे डांबरीकरण करावे अन्यथा कुठलीही पूर्वसूचना न देता आंदोलन करण्याचा इशाराही राष्ट्रवादी काँग्रेसचे बागलाण तालुकाध्यक्ष सम्राट काकडे, बिजोरसेचे सरपंच राजेंद्र मोरे, उपसरपंच योगेश काकडे, रावसाहेब काकडे, भाजपचे बाबाजी काकडे, नितीन काकडे, दिनेश मोरे, अभिषेक काकडे, धनंजय मोरे, विलास मोरे, रिगूं मोरे, पप्पू मोरे ह्या सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी दिलेला होता.

अनेक वर्षांपासून ह्या रस्त्यावरील खड्ड्यातून मार्गक्रमण करावे लागत होते. ह्या खड्ड्यामुळे याठिकाणी अनेक अपघात व्हायचे. अधिकाऱ्यांकडे ह्या रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत तक्रारी तसेच निवेदने दिली. निधी मिळाला असून, कामाचे टेंडरही निघाले आहे. आता लवकरच कमाल सुरवात होईल. अशी भावना येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Nashik | मनमाड रेल्वे स्टेशन महामार्गावरील ओव्हरब्रिजचा काही भाग कोसळला


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here