Crime News | तीन बायकांचे शौक पूर्ण करण्यासाठी, तरुण बनला….

0
26
Nashik Crime
Nashik Crime

Crime News |  चोरीच्या अनेक घटना ह्या सर्रास घड असतात. मात्र, यामागे काही वेळेस अशी काही करणे असतात की, जी ऐकून कधी हसूही येते. अशाच एका चोरांच्या टोळीचा कानपूर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे. पण या मागची कहाणी ऐकून तुम्हाला आश्चर्यच वाटेल. या घटनेत या टोळीच्या प्रमुखाचे तीन लग्न झाले असून, त्याच्या बायकांच्या हौशी पूर्ण करण्यासाठी तो हे कृत्य करत असल्याचे पोलिस तपासातून उघड झाले आहे.

Crime News | नेमकं प्रकरण काय..?

कानपूरची ही घटना असून, पोलिसांनी चोरीचा पर्दाफाश केला आहे. घटना या आठवड्यात शुक्रवार रोजी उघडकीस आली आहे. या प्रकरणी आरोपीचे नाव अमित असून, धक्कादायक म्हणजे या आरोपी अमित याचे तीन लग्न झाले आहेत. दरम्यान, त्याच्या या तीन बायकांचा खर्च भागवण्यासाठी आणि त्यांच्या हौशी पूर्ण करण्यासाठी अमित अनेक वर्षांपासून चोरी करत होता. या आरोपीच्या विरोधात आतापर्यंत उत्तर प्रदेश मधील अनेक पोलीस ठाण्यांमध्ये चोरीच्या तक्रारी नोंदविण्यात आलेल्या आहेत. तसेच, यामुळे हा आरोपी अनेकदा तुरुंगात देखील जाऊन आलेला आहे.(Crime News)

Crime News | २१ वर्ष लहान प्रेयसीने लग्नाला नकार दिला अन् मॅनेजरने ऑफिसमध्येच..

कानपूर पश्चिम विभागाचे अतिरिक्त पोलिस उपायुक्त आकाश पटेल हे कानपूरच्या चौबेपूर येथे ताब्यात घेण्यात आलेल्या चोरांच्या प्रकरणी पत्रकार परिषद देत होते. याच परिषदेत पोलिसांनी चोराच्या कहाणीचा उलगडा केला आहे. चौबेपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सलग तीन घरांमध्ये चोरीच्या घटना घडल्या होत्या. या प्रकरणी पोलिसांत तक्रार देण्यात आली होती. या नंतर पोलिसांनी पश्चिम विभागातील निगराणी पथकासह अनेक वेगवेगळी पथके तयार करून या आरोपींचा शोध सुरू केला होता. या चौकशी दरम्यान कानपूर पोलिसांनी संबंधित तीन गुन्हेगारांना पकडले होते. त्यापैकीच अमित हा एक आहे.

Crime News | भगव्या ध्वजाचा अपमान करणाऱ्या मुस्लिम युवकाची नग्न धिंड

दरम्यान, पोलिसांनी या अटक करण्यात आलेल्या चोरट्यांकडून अनेक वस्तु ताब्यात घेतल्या यात लाखो रूपये किंमतीचे दागिने, तब्बल अडीच लाख रुपयांची रोकड, महागडे टीव्ही, जवळपास २३ स्मार्ट फोन यांचा समावेश आहे. तर इतर अनेक महागड्या वस्तूही पोलिसांनी जप्त केल्या आहेत. हे चोरटे डॉक्टरांच्या स्विफ्ट डिझायर कारचा वापर करून जिल्ह्यातील ग्रामीण भागात चोरी करत होते. ग्रामीण भागात कमी घरे असलेल्या वस्ती या त्यांच्या टार्गेटवर होत्या. दरम्यान, या चोराच्या टोळी प्रमुखाची पोलिसांनी चौकशी केली असता, आपल्या तीन बायकांचे खर्च पुरवण्यासाठी चोरी करत असल्याचे त्याने सांगितले. (Crime News)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here