Cotton rate : महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचं महत्त्वाचं नगदी पीक म्हणून कापसाला ओळखलं जातं. म्हणूनच कापसाला पांढर सोनं म्हणूनही नाव देण्यात आल आहे. कापसासाठी आवश्यक असणारी मृदा आणि वातावरण हे विदर्भात असल्याने विदर्भातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर कापसाचे उत्पादन घेत असतात आणि या ठिकाणच्या कापसाला राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये मोठ्या प्रमाणावर मागणी देखील असते.
मात्र गेल्या काही महिन्यांपासून कापसाच्या दरांमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली होती. त्यातच पुन्हा एकदा कापसाच्या दरांमध्ये तेजी आल्याचं बघायला मिळत आहे. मागील आठवड्यात अनेक बाजारांमध्ये कापसाच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. यातच आता पुन्हा एकदा कापसाचे दर शंभर ते दीडशे रुपयांनी वाढले आहेत यामुळे पुन्हा एकदा कमी भावामुळे अडचणीत सापडलेल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
गेल्या काही दिवसात कापसामध्ये जवळपास एक हजार तीनशे रुपयांची वाढ झाली आहे. नेहमीच्या हमी भावापेक्षा कापसाचा बाजार भाव जास्त आहे. याला दोन महिन्यांपासून कापसाचे भाव घसरत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात होती. तर हे दरवाढीची मागणी देखील केली जात होती. तर दरवाढी संदर्भात आश्वासन देखील दिले जात होते.
सद्यस्थितीत कापसाचा दर हा सहा ते सात हजार रुपये प्रतिक्विंटल सुरू आहे. गेल्या काही दिवसात कापसाच्या दरांमध्ये वाढ झाली असून यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम