Skip to content

Congress strike :. संभाजी भिडेंच्या वक्तव्या विरोधात काँग्रेस आक्रमक


Congress strike : ‘गांधीजींचे वडील हे मुसलमान जमीनदार होते’ असे विधान करणाऱ्या संभाजी भिडे गुरुजी यांच्याविरोधात आज धुळ्यात महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला दुधाने अभिषेक करून संभाजी भिडे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत संभाजी भिडे यांना अटक करून कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्या बद्दल केलेल्या निंदाजनक वक्तव्याचा धुळ्यात काँग्रेसने आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वात आंदोलन केले.

शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी काल एका कार्यक्रमात महात्मा गांधी यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्याचा राज्यभरातून निषेध व्यक्त होत आहे, या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आज धुळ्यात काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते दुधाचा अभिषेक करून आंदोलन करण्यात आले. महात्मा गांधीजींच्या वडिलांबद्दल संभाजी भिडे यांनी काल एका कार्यक्रमात केलेल्या वक्तव्याचा राज्यभरातून विविध संघटनांकडून निषेध व्यक्त होत आहे. संभाजी भिडे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी संपूर्ण राज्यभरातून करण्यात येत असताना आज धुळे शहरातील आग्रा रोडवर असलेल्या महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते दुधाचा अभिषेक करण्यात आला.

यावेळी काँग्रेसच्या वतीने संभाजी भिडे यांचा निषेध करीत आंदोलन करण्यात आले. संभाजी भिडे हे महापुरुषांबद्दल नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करीत असतात, मात्र तरी देखील राज्य सरकार त्यांच्यावर कोणतीच कारवाई करत नाही, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या बद्दल त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्य सरकारने त्यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांना अटक करावी अन्यथा येणाऱ्या काळात काँग्रेस पक्षाच्या वतीने संभाजी भिडे यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेण्यात येईल अशी भूमिका आमदार कुणाल पाटील यांनी यावेळी मांडली. यावेळी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!