Congress Politics | विधानसभा निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीचा धुव्वा उडवत विजय मिळवला असून 288 पैकी तब्बल 230 जागांची आघाडी मिळवत हा ऐतिहासिक विजय प्राप्त केला आहे. या निकालानंतर विरोधकांकडून ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप केला जात असून निकालाच्या दोन दिवस आधी महाविकास आघाडी सरकारमध्ये स्थापनेसाठी आमदारांची जुळवाजवळ करण्याकरिता हालचाली सुरू होत्या. परंतु महाविकास आघाडीला या निवडणुकीत अवघ्या 50 जागांपर्यंत देखील पोहोचता आले नसून केवळ 46 जागांवरच समाधान मानावं लागलं. त्यानंतर निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात अशी मागणी विरोधकांकडून केली जात असून या सर्व गदारोळात आता काँग्रेसमध्ये अंतर्गत वादाची ठिणगी पडली असल्याची माहिती आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेसच्या पराभूत उमेदवारांनी आपल्याच पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांवर आरोप केले असून या पराभूत आमदारांनी आपल्या पराभवाचा खापर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या डोक्यावर फोडलं आहे. विशेष म्हणजे नागपूर मध्य मतदार संघाचे काँग्रेसचे उमेदवार बंटी शेळके यांनी तर उघडपणे नाना पटोलेंवर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळेच काँग्रेस मधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.
नेमकं प्रकरण काय?
विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या काँग्रेसच्या उमेदवारांची आज काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींसोबत बैठक पार पडली असून या बैठकीत काँग्रेस पक्षाच्या पराभूत उमेदवारांनी नाना पटोले यांच्या विषयी नाराजी व्यक्त केली आहे. विदर्भातील काँग्रेसच्या पराभूत उमेदवारांनी “नाना पटवले हे आमच्या पराभवाला कारणीभूत आहेत.” अशी भूमिका या बैठकीत मांडली. नागपूर मध्ये काँग्रेस उमेदवारांच्या प्रचाराकरिता काँग्रेसचे नेते फिरकले नाहीत. आत्मविश्वासातील नेते प्रचाराला न गेल्यामुळे पक्षाची अशी परिस्थिती झाल्याची खंत देखील पराभूतांनी यावेळी बैठकीत मांडली.
Congress Political | काँग्रेसमधील धुसफूस चव्हाट्यावर; खुर्ची वरून रंगले नाराजी नाट्य
काँग्रेस पक्षातील नेतेमंडळीच आमच्या पराभवाला कारणीभूत असून ईव्हीएममुळे सगळ्या निवडणुकीत घोळ झाला आहे. त्यामुळे यासंदर्भात आगामी काळात आवाज उठवला पाहिजे. अशी एकमुखी मागणी या पराभूतांकडून करण्यात आली असल्याची माहिती आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम