Congress Political | विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या काँग्रेसलाही पराभवाचा सामना करावा लागला. काँग्रेसचे अवघे सोळाच आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना राजीनामा मागण्यात आला आहे. त्यामुळे आता नवा प्रदेशाध्यक्ष कोण होणार याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. विधानसभेचे माजी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यासाठी उत्सुक असल्याचे दिसून येत आहे.
Congress Political | काँग्रेसमधील धुसफूस चव्हाट्यावर; खुर्ची वरून रंगले नाराजी नाट्य
वडेट्टीवार प्रदेशाध्यक्ष पदासाठी इच्छुक
पटोले यांच्या राजीनाम्याबाबत बोलताना वडेट्टीवार यांनी, “याबाबत मला काही माहित नाही. माध्यमातूनच ही माहिती माझ्यापर्यंत पोहोचली आहे. तेव्हा त्याबाबत आत्ताच काही बोलणे उचित ठरणार नाही. परंतु पक्षाने आजवर मला जी जबाबदारी दिली. ती योग्य प्रकारे पार पाडली आहे. आता जी जबाबदारी देतील, आदेश देतील तो सुद्धा प्रामाणिकपणे पाळला जाईल.” असे म्हटले आहे. त्यामुळे त्यांनी अप्रत्यक्षरीत्या प्रदेशाध्यक्ष पद स्वीकारण्यास इच्छुक असल्याचे सूचित केल्याचे ही आता बोलले जात आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम