मुंबई – शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड करत शिवसेनेत फूट पाडली, त्याचे बक्षीस म्हणून शिंदेना थेट मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसवले. आता येत्या ऑक्टोबरमध्ये शिंदे सरकारचा पुढचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. त्यापूर्वीच पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कॉंग्रेस आमदारांचा मोठा गट भाजपमध्ये सामील होण्याची शक्यता असल्याने त्यांना भाजपमध्ये येण्याचे बक्षीस म्हणून आगामी मंत्रिमंडळात स्थान दिले जाण्याची शक्यता असल्याने सप्टेंबरमध्ये होणारा मंत्रिमंडळ विस्तार आता ऑक्टोबरमध्ये होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे शिंदे गट आणि भाजपच्या बड्या मंत्र्यांचा पत्ता कापण्याची शक्यता आहे.
मध्यंतरी कॉंग्रेसमधील एक मोठा गट पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांवर नाराज असून, त्यातील काही आमदारांनी कॉंग्रेस हायकमांडची भेट घेतली होती. मात्र पक्षाकडून ह्याची विशेष दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे ह्या आमदारांनी शिंदे सरकारच्या विश्वासदर्शक ठरावाला दांडी मारत नव्या सरकारला अप्रत्यक्षपणे मदत केली होती. त्यामुळेच त्या नाराज गटाला भाजप आपल्या गळाला लावण्याची शक्यता आहे. आता ऑक्टोबरमध्ये कोणते २० जण मंत्रीपदाची शपथ घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
याधीही शिंदेच्या बंडावेळी कॉंग्रेस आमदारांचा गट भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याची चर्चा रंगली होती. मात्र ही केवळ अफवा असल्याचे सांगत चर्चेला पूर्णविराम दिला होता.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम