देवळा तालुका दुष्काळी जाहीर करावा या मागणीसाठी काँग्रेसचं आमरण उपोषण सुरू

0
20

सोमनाथ जगताप (प्रतिनिधी : देवळा) | देवळा तालुका दुष्काळी जाहीर करावा या मागणीसाठी शनिवार (दि. ४) पासून देवळा येथे राष्ट्रीय कॉग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केलेले आहे. राज्य शासनाने दि. १२ ऑक्टोबर २०२३ रोजी काढलेल्या शासननिर्णयाद्वारे राज्यातील ४२ तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित केलेला असुन सदर शासन निर्णयात नाशिक जिल्ह्यातील चांदवड-देवळा तालुक्यांचा समावेश केलेला नाही.

Nashik News | महाबोधी वृक्षाला फुटली नवपालवी

देवळा तालुक्यात अत्यल्प पाऊस झाल्याने भीषण पाणीटंचाई निर्माण झालेली आहे. खरीप हंगाम पूर्ण वाया गेल्याने शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला असून, मजूर वर्गाच्याही हाताला काम नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर तसेच मजुर वर्गावर उपासमारीची वेळ आलेली आहे. यामुळे देवळा तालुका दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करावा या मागणीचे तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने यापूर्वी प्रशासनाला निवेदन देण्यात आलेले होते. सदर निवेदनानंतरही शासनाकडून देवळा तालुका दुष्काळी जाहीर होण्याबाबत कुठलीही कार्यवाही होतांना दिसून आली नाही.

Onion Rate | कांद्याच्या दरांत आणखी घसरण..;शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण
याच्या निषेधार्थ,  देवळा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने शनिवारी (दि. ४) पासून देवळा पाचकंदील समोर काँग्रेसचे देवळा तालुका अध्यक्ष दिनकर निकम, प्रांतिक सदस्य दिलीप पाटील, आर्की. स्वप्निल सावंत, दिलीप आहेर, बाळासाहेब शिंदे, अरुणा खैरनार आदी पदाधिकाऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. शनिवारी उपोषणस्थळी माजी आमदार शिरीष कुमार कोतवाल, शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सुनील पवार, गटप्रमुख प्रशांत शेवाळे, बाजार समितीचे माजी संचालक डॉ राजेंद्र ब्राम्हणकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष पंडितराव निकम, दिनकर जाधव, महेंद्र आहेर, संजय सावळे, संदेश निकम, समता परिषदेचे मनोहर खैरनार, हिरामण आहेर,  प्रवीण सूर्यवंशी, राजेंद्र शेवाळे, तुषार शिंदे आदींनी भेट दिली.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here