Congress Cross Voting | काँग्रेसकडून ‘त्या’ आमदारांचा कारवाई; नावं जाहीर करत पत्ता कट..!

0
56
Congress Cross Voting
Congress Cross Voting

मुंबई :  काल राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून विधानसभेसाठीचे दोन उमेदवार जाहीर करण्यात आले. तर, शरद पवार गटाकडूनही रोहित पाटील आणि भांगरे यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. तर, अजित पवार गट आणि ठाकरे गटानेही नाशिकमधील आपले दोन उमेदवार जाहीर केलेत. दरम्यान, इतर पक्ष उमेदवार जाहीर करत असताना याउलट काँग्रेसने मात्र तिकीट कापलेल्या उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. (Congress Cross Voting)

Congress Cross Voting | वरिष्ठ नेत्यांनी रचला होता सापळा 

विधानपरिषद निवडणुकीत (Vidhan Parisad Election) काँग्रेसच्या सात ते आठ आमदारांनी क्रॉस वोटिंग (Cross Voting) केल्याचे आरोप केले होते. यानंतर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी या आमदारांवर कारवाई करणार असल्याचा इशारा दिला होता. गेल्या निवडणुकीतही काँग्रेसच्या काही आमदारांनी क्रॉस वोटिंग केले असून, यामुळे उमेदवाराचा पराभव झाला.(Congress Cross Voting)

Congress MLA | आमदार खोसकरांचा मोठा गौप्यस्फोट..!; म्हणाले,’..त्यांच्यामुळे आमदार नाराज’

असाच प्रकार यावेळीही होण्याची शक्यता असल्याने आम्ही सापळा रचला होता आणि यात हे फुटीर आमदार अडकलेले असून, या फुटीर आमदारांवर कारवाई केली जाणार असल्याचे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी(Congress) जाहीरपणे सांगितले होते. यानंतर आता अखेर या फुटीर आमदारांचा पत्ता कट करण्यात आलयाची माहिती आहे.(Vidhan Sabha Election)

क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांना विधानसभेला (Vidhan Sabha Election) तिकीट न देण्याची कारवाई करण्याचे आदेश काँग्रेसच्या हायकमांडने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना दिल्याची सूत्रांची माहिती दिली आहे. काँग्रेस पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक झाली. तर, कारवाई केलेल्या पाच आमदारांच्या मतदार संघात नवीन उमेदवारांना संधी देण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.(Congress Cross Voting)

Congress MLA | ‘त्या’ फुटीर आमदारांची नावे समोर; नाशिकच्याही एका आमदाराचा समावेश..?

‘या’ आमदारांचा पत्ता कट..?

  1. सुलभा खोडके – अमरावती
  2. झिशान सिद्दीकी – वांद्रे पूर्व
  3. हिरामण खोसकर – इगतपुरी (अ.जा)
  4. जितेश अंतापूरकर – देगलूर (अ.जा)
  5. मोहन हंबर्डे – नांदेड दक्षिण (Congress Cross Voting)

नेमकं प्रकरण काय..?

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण यांनी क्रॉस वोटिंग करणाऱ्या संशयित आमदारांवर जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त केली होती. याबाबत राज्य कार्यकरिणीने दिल्लीला अहवालदेखील पाठवला होता. त्यानंतर हायकमांडकडून कारवाई करण्यात आली असून, बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती आहे. (Congress Cross Voting)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here