Bajaj CNG Bike | दुचाकीमध्ये बजाज क्रांती आणणार आहेत. पेट्रोलनंतर इलेक्ट्रिक दुचाकींची भर आता पडलेली आहे. तर बजाज CNG आणि LPG बाईकचा प्रयोग करत आहे. एका समोर आलेल्या दाव्यानुसार बजाजने CNG बाईक तयार केली आहे. या बाईकची रस्त्यावरील चाचणी पण सुरु झाल्याचा दावा करण्यात येत आहे. Bajaj कंपनी CNG Bike ची टेस्टिंग करत आहे. रस्त्यावरील चाचणीसाठी ही दुचाकी बाहेर पडल्याचा दावा एका छायाचित्राच्या आधारे करण्यात येत आहे.
देवळा बाजार समितीचे माजी संचालक जिभाऊ शिंदे यांचे निधन
काय असेल या नवीन बाईकमध्ये?
या नवीन बाईकमध्ये टेलिस्कोपिक फोर्क, फ्रंट डिस्क ब्रेक, एलिव्हेटेड हँडलबार, अपराइट राइडिंग पोझिशन,अलॉय व्हील हे पार्ट असणार आहेत. Pulsar NS125 चीच ही कॉपी असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. या बाईकमध्ये मोनोशॉक देण्यात आलेले आहे. वळणदार आणि मोठी फ्युएल टाकी असल्याचे समोर येते आहे. सध्या या बाईकला एक सिंगल पीस सीट दिलेले दिसते आहे. टायर हगर, इंटिग्रेटेड फूटरेस्टसह साडी गार्ड आणि इंजिन क्रॅश गार्ड यांचा समावेश आहे. एअर-कूल्ड मोटरची शक्यता वर्तविण्यात येते आहे. एकूणच सर्व डिझाईनवरुन ही बजाजची CNG Bike असल्याचा दावा करण्यात येत आहे.
Maratha Reservation | राज ठाकरे विरुद्ध मनोज जरांगे ह्या नव्या वादाला ठिणगी..?
CNG बाईकचा पर्याय का?
CNG बाईकची ही झलक असल्याचा दावा करण्यात येतो आहे. ही CNG Bike बाजारात दाखल व्हायला आणखी एक वर्ष तरी लागण्याची शक्यता आहे. इलेक्ट्रिक बाईकबाबत अजून पण भारतीय साशंक असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पेट्रोल आणि ई-बाईक यामधील CNG हा पर्याय भारतीयांच्या पसंतीला उतरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळेच Bajaj CNG Bike ही बाईक बाजारात हंगामा करेल असा दावा करण्यात येत आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम