मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रातील ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने’च्या धर्तीवर आता राज्यात ‘मुख्यमंत्री किसान योजना’ लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
ज्यात राज्यातील शेतकऱ्यांना वर्षाकाठी सहा हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. मागील तीन दिवसापूर्वी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळाली असून येत्या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पात या योजनेसाठी विशेष तरतूद करण्यात येणार आहे.
सध्या देशपातळीवर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राबवली जात आहे, त्याच धर्तीवर राज्यात ही योजना राबवण्यात येणार आहे. ज्यानुसार दरवर्षी योजनेतील पात्र शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहेत. मात्र, ही रक्कम शेतकऱ्यांना दर महिन्याला टप्प्या टप्प्याने दिली जाणार आहे. सविस्तर माहिती अद्याप आलेली नसून लवकरच सरकारतर्फे याची अधिकृत घोषणा केली जाणार आहे.
काय आहे केंद्राची ‘पीएम किसान सन्मान निधी योजना’ ?
केंद्राच्या या योजनेअंतर्गत केंद्र सरकार लहान व अल्पभूधारक शेतकऱ्यांना प्रतिवर्षी सहा हजार रुपयांचे अनुदान देते. वर्षातून तीनदा प्रत्येकी दोन हजार रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली जाते. केंद्र सरकार हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम