मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाज रस्त्यावर उतरलेला आहे. राज्यभर आंदोलनं केली जात आहेत. बीडमध्ये आमदारांची घरं जाळली गेली. म्हणुन या सर्व पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या सगळ्या घटनांवर लक्ष ठेवून आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या घटनांचा आढावाही घेत आहेत. तसंच या पार्श्वभूमीवर प्रशासनाला अलर्ट राहण्याच्याही सूचना त्यांनी दिल्या आहेत. काल रात्रभर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झोपलेले नाहीत. राज्यातील संपूर्ण परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातली राजकीय परिस्थितीचा त्यांनी आढावा घेतला आहे. तसेच कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती घेतली.
Breaking News | चांदवड येथे मराठा आंदोलकांनी टायर जाळले तर नाशकात भव्य पायी मूक मोर्चा
राज्यात ठिकठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पुन्हा एकदा ॲक्शन मोडमध्ये आलेले आहेत. राज्य सरकारचं एक शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला जाण्याची शक्यता आहे. यात तिन्ही पक्षाचे दोन-दोन नेते उपस्थित राहणार राहणार असल्याची माहिती सुत्रांनी दिलेली आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांच्या घराबाहेरच्या सुरक्षेत वाढ
मराठा आरक्षणासाठी सुरु असलेलं आंदोलन आता अधिक तीव्र झालेलं आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढण्यात आलेला आहे. वर्षा निवासस्थानाकडे जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. महालक्ष्मी रोड ते मलबार हिल या परिसरात बॅरिगेटिंग करण्यात आलेलं आहे. वर्षा निवासस्थानी जाणाऱ्या मार्गावर दोन ते तीन ठिकाणी पोलिसांनी बॅरिगेटिंग लावण्यात आलेलं आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलीस सज्ज झाली आहे. तसंच मुंबई पोलिसांनी मरबाड हिल परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात आहे. तर वर्षा निवासस्थानी येणाऱ्या सर्व मार्गावर मोठ्या प्रमाणात बॅरिगेट्स लावण्यात आले आहेत. पोलिसांनी बंदोबस्त लावत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलेली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम