CM Eknath Shinde | विरोधी पक्षांचे अवसान गळाले; मुख्यमंत्र्यांनी सर्वांनाच घेरले

0
42
CM Eknath Shinde
CM Eknath Shinde

CM Eknath Shinde |  राज्य विधिमंडळाचे नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस असून, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसत आहे. आज त्यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच विरोधकांवर टीका करत असल्याचे दिसत आहे.(CM Eknath Shinde)

यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी विधानसभेत अंतिम आठवड्याच्या प्रस्तावाच्या चर्चेवर उत्तर देताना विरोधकांना चांगलेच घेरले आहे. यावेळी बोलताना त्यांनी दिशा सलियन प्रकरणापासून ते महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात कोविडमध्ये झालेल्या घोटाळ्यांपर्यंत विरोधकांची सर्वच खरडपट्टी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढली.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हटले की, हा प्रस्ताव दाखल करताना विरोधी पक्ष हा गोंधळलेल्या अवस्थेत असल्याचे दिसत आहे. चहापानावर बहिष्कार टाकला तेव्हा विरोधी पक्षांचे पत्र आले होते. त्यावेळी त्यांचे अवसान गळाले असल्याचे दिसत होते. वरिष्ठ नेते इंडीया आघाडीच्या जागा वाटपाच्या कामात व्यस्त असल्याने दिशा सलियन मृत्यू प्रकरणामुळे आधीच ते दिशाहीन झालेले गलबत आणखी भरकटलेले दिसले असा टोला शिंदे यांनी लगावला आहे.(CM Eknath Shinde)

Winter session | इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील गुन्ह्यांचं प्रमाण कमी; फडणवीसांचा अधिवेशनात दावा

दरम्यान, ज्यावेळी आम्ही राज्य हातात घेतले त्यानंतर एफडीआय मध्ये राज्य पुन्हा पहिल्या क्रमांकावर आले. मेट्रो, कारशेड, समृद्धी, बुलेट ट्रेन, सी लिंक, मिसिंग लिंक, कोस्टल रोड ह्या पायाभूत सुविधांचा ‘यू टर्न’ आम्ही बंद केला. ह्या सूडबुद्धीने काम करणाऱ्या त्या योजना फास्ट ट्रॅकवर आणल्याचे यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हटले आहे. दरम्यान, ह्या आरोपांना आरोप म्हणून याला विरोध करू नये. चांगल्याला कामांना चांगलेच म्हणायचे. दरम्यान, नाईलाजाने का होईना आमच्या कामांची स्तुती हे विरोधक करित आहेत. (CM Eknath Shinde)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्यावर मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून टीका केली असून, काँग्रेस नेते अशोक चव्हाण हे आता सभागृहात नाहीये. पण, काल त्यांनी आरोप केलेत की मराठ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाबाबत मोठे राजकारण केले असं, मी अध्यक्ष होऊ नये म्हणून त्यांनी पडद्याआड मोठे प्रयत्न केले. मी अध्यक्ष झालो तर तातडीने मराठा आरक्षणासाठी तातडीने काम करेल.(CM Eknath Shinde)

Chhagan Bhujbal | ‘महाराष्ट्र सदन घोटाळा’ प्रकरणी भुजबळ पुन्हा अडकणार..?

ही भीती अडीच वर्षांचे मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण यांना होती, असा दावाही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. देशाचे एक नंबरचे मुख्यमंत्री म्हणत घरी बसून कामे कशी होतात. तो नंबर पुढून पहिला नाहीतर, शेवटून होता असा खोचक टोला यावेळी मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांना त्यांचे नाव न घेता लगावला. (CM Eknath Shinde)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here