CM Eknath Shinde | अपघातग्रस्तांसाठी मुख्यमंत्री बनले देवदूत; वाचवले तरुणाचे प्राण

0
25
CM Eknath Shinde
CM Eknath Shinde

CM Eknath Shinde |   राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे आजपर्यंतचे सर्वात संवेदनशील मुख्यमंत्री म्हणून ओळखले जातात. त्यांच्या ह्या स्वभावामुळेच ते अनेकांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. राज्याच्या जनतेने त्यांच्या ह्या स्वभावाचे नेहमीच कौतुक केले आहे. दरम्यान, आज पुन्हा त्यांच्या ह्या स्वभावाचे दर्शन घडले असून मुख्यमंत्र्यांनी स्वतः एका अपघातग्रस्त तरुणाचे प्राण वाचवले आहे.

देवदूताप्रमाणे धावून जात त्यांनी ह्या आपघातग्रस्तांचे प्राण वंचवे असून, यात एका व्यक्तीसह अन्य तिघांना मदत करत त्यांना तत्काळ जवळील एका खाजगी रुग्णालयात दाखल केलं आहे. मुख्यमंत्री शिंदे(CM Eknath Shinde) यांनी ह्या आपघातातील जखमींवर तातडीने उपचार करण्याचे निर्देश देखील संबंधित खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांना दिले आहेत. दरम्यान, मुंबईहून नागपुरकडे परतल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी तात्काळ बाजार गावातील सोलर अर्नामेंट्स ह्या कंपनीला भेट देत तेथील परिस्थितीची पाहणी केली.

Trimbakeshwar | अधिकारी-मंत्र्यांनीच आता सिंहस्थाचे शाहीस्नान करावे; साधू-महंत भडकले

दरम्यान, या घटनेचा आढावा घेत ते पुन्हा नागपुरच्या दिशेने परतताना गोंडखैरी येथील बस स्थानकाजवळ एक भीषण अपघात झालेला असल्याचे त्यांना समजले. त्यांनी याठिकाणी झालेल्या अपघातात एक ट्रक आणि दुचाकीची धडक होऊन दुचाकीस्वार हा थेट ट्रकच्या बोनेटमध्ये जाऊन अडकलेला होता. त्यावेळी त्या ट्रकला एक वेगवान कारही येऊन धडकली. त्यामुळे ह्या कारमधीलही काही जण गंभीर जखमी झाले होते.(CM Eknath Shinde)

हा अपघात झाल्याचे कळताच त्याठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. दरम्यान, ही सर्व परिस्थिती पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी आपला ताफा घटना स्थळी थांबवण्याच्या सूचना केल्या. आणि त्यानंतर त्यांनी स्वतः खाली उतरत त्या ठिकाणी उभे राहून त्या जखमी तरुणाला ट्रकखालून बाहेर काढायला लावले.

आणि त्याचा पाय गंभीर जखमी झालेला असल्याने तत्काळ त्याला आपल्या ताफ्यातील एक रुग्णवाहिका देत त्यांनी स्वतः त्याला नागपुरमधील रवी नगर ह्या चौकातील सेनगुप्ता ह्या खाजगी रुग्णालयात दाखल केले. तसेच या तरुणाला तत्काळ अतिदक्षता विभागात दाखल करून त्याच्यावर लवकरात लवकर उपचार सुरू करण्याचे डॉक्टरांना निर्देश केले.

Devendra Fadnavis | राहुल गांधींपासून पवारांपर्यंत सर्वांनाच घेरले; फडणवीस कडाडले

नातेवाईकांनी मानले आभार | (CM Eknath Shinde)

ह्या अपघातात जखमी तरुणाचे नाव हे गिरीश केशरावजी तिडके असून, हा नागपूरच्या गोंड खैरीवाडी या परिसरातील रहिवासी आहे. त्याच्यासोबत या अपघातात जखमी झालेले इतर व्यक्ती नामे वंदना राकेश मेश्राम (रा. सिद्धार्थ नगरवाडी, नागपूर), रंजना शिशुपाल रामटेके (रा. रामबाग मेडिकल चौक, नागपूर) तसेच शुद्धधन बाळूजी काळपांडे (रा. मौदा, नागपूर) यांनाही तेथील रुग्णालयात दाखल केले.

दरम्यान, ह्या जखमी तरुणाला बाहेर काढण्यापासून ते त्याला रुग्णालयात दाखल करण्यापर्यंत स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांनी स्वतः त्या जखमी तरुणाचे पालक बनत त्याला आणि सोबतच्या जखमी रुग्णांना रुग्णालयात दाखल केल्याने हे सर्व अपघातग्रस्त लोक सुरक्षीत असल्याची भावना रुग्णांच्या कुटुंबियांनी व्यक्त केली आहे.

author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here