Chhagan Bhujbal | काल राज्य सरकारने मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत १० टक्के आरक्षण जाहीर केले. सरकारच्या या निर्णयाचे मंत्र्यांकडून स्वागत केले जात आहे. मात्र, मराठा समाजाकडून या निर्णयाची होली केली जात आहे. तर, मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे हेदेखील निर्णय मान्य नसून आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याचे बोलत आहेत. आज ते त्यांच्या आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार आहेत.
छत्रपतींच्या पुतळ्याखाली बसून शिवीगाळ
तर, मराठा आरक्षण विधीमंडळात मंजूर झाल्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेतली असून, ते म्हणाले की,” मनोज जरांगे यांच्याकडून आपल्याला धमकी दिली जात आहे. तसेच आपल्याला शिवीगाळ, दादागिरी आणि धमक्या रोज सुरू आहेत. रोज मला टपकवण्याची भाषा केली जात आहे. मनोज जरांगेंनी थेट कलेक्टर व एसपींनादेखील शिवीगाळ केली असून, वर छत्रपतींचा पुतळा आणि त्या पुतळ्याखाली बसून यांच्याकडून शिवीगाळ केली जाते, असा दावा मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे.(Chhagan Bhujbal)
Manoj Jarange | तिकडे आरक्षण एकमताने पास अन् इकडे जरांगेंनी सलाईन फेकली
वर गोधडी पांघरतो आणि आत सर्व चालू
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की,“तो वरती गोधडी पांघरून घेतो आणि आतमध्ये त्याचं सर्व चालू असतं. आत मोबाईल बघतो. आज सर्वांना कळालंच पाहिजे की, हा मनोज जरांगे काय आहे ते. यावर कायदेशीर कारवाई तर करणारच. पण माझ्यावर जर कुणीही हल्ला केला. तरी या जरांगेला आत टाकलं पाहिजे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पोलीस काय करताय ? मी मरणाला घाबरत नाही. पण माझ्याबद्दल काही घाण गाणी तयार केली जात आहेत. रात्री उशिरापर्यंत येथे डीजे लावला जातो”, असे आरोप भुजबळ यांनी केले आहे. (Chhagan Bhujbal)
Maratha Reservation | ठरलं तर..! मराठा समाजाला इतके आरक्षण..?
Chhagan Bhujbal | मग आता कुणबी कशाला पाहिजे?
“कुणबी जात प्रमाणपत्रामध्ये खाडाखोड करण्यात आली असून, हे कुणबीकरण थांबलं पाहिजे. आता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिलं आहे. मग आता कुणबी कशाला पाहिजे? सगेसोयरे आले पाहिजे, अशी त्यांची मागणी आहे. पण ते कायद्यात तर बसलं पाहिजे. आमचा तर सगेसोयरे या शब्दालादेखील विरोध आहे. हा तर्क पूर्णपणे बेकायदेशीर आणि कोर्टाच्या विरोधातील आहे. मराठा आरक्षण मिळालं नाही तर, शिक्षणात सूट देण्याचा जीआर काढला होता.
त्यानुसार मग सगळ्याच समाजाला या सुविधा द्या. जशी झारखंड सरकारने जातनिहाय जनगणना करण्याचा आदेश दिलाय. तसे तुम्हीही महाराष्ट्रात जातनिहाय जनगणना करा. ओबीसी समाज किती आहेत ते एकदा समोर येउद्या. जे मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना मिळत आहे ते ओबीसी समाजाच्या मुलांनाही मिळालं पाहिजे, अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे.(Chhagan Bhujbal)
देवेंद्र फडणवीसांना सर्व माहित आहे.
“देवेंद्र फडणवीसांना सर्व माहित आहे. एक माणूस सगळा महाराष्ट्र वेठीस धरतोय. त्याच्यावर काहीच कारवाई का केली जात नाही. मुख्यमंत्र्यांच्या विरोधात एक पोस्ट केली तरी तातडीने अटक केली जाते. याने तर थेट शिवी दिली. मग पोलीस काय करताय?, असंही भुजबळ म्हणाले.(Chhagan Bhujbal)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम