Chandwad | जनता विद्यालय सुतारखेडे येथे शिक्षक दिन व श्री चक्रधर स्वामी अवतार दिन उत्साहात साजरा

0
10
Chandwad
Chandwad

Chandwad | मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालय सुतारखेडे येथे ‘शिक्षक दिन’ तसेच ‘श्री चक्रधर स्वामी अवतार दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी सदर कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थ्यांनी आपला सक्रिय सहभाग नोंदविला व शिक्षकांप्रती असलेला आपला आदर व्यक्त केला. या कार्यक्रमात सर्व शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी दिवसभर अध्यापनाचे कामकाज केले. तसेच शिक्षकेतर बांधवांची भूमिकाही विद्यार्थ्यांनी साकारली. शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी आदर्श अध्यापन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले.

५ सप्टेंबर हा दिवस डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती म्हणून साजरा केला जातो. देशभरात शिक्षकांविषयी आदरभाव व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. शिक्षक हे आपल्या समाजाचा कणा आहेत. विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडविण्यात आणि त्यांना देशाचे आदर्श व संस्कारीत नागरिक बनविण्यात शिक्षकांची महत्त्वाची भूमिका आहे. शिक्षक हे मुलांचे व्यक्तिमत्व घडवून त्यांचे भविष्य उज्वल करतात आणि चांगल्या गोष्टी शिकण्यासाठी ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. जीवनातील प्रत्येक टप्प्यावर शिक्षक आपल्या पाठीशी कायम उभे राहतात. शिक्षक हे आपल्यासाठी सदैव ज्ञान आणि बुद्धीने भरलेला स्रोत आहे. आपले आयुष्य घडविणाऱ्या सर्व शिक्षकांचे आम्ही सदैव ऋणी आहोत असे वक्त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.

Chandwad | चांदवडमध्ये युवक काँग्रेसतर्फे पक्ष बांधणीसाठी ‘चलो पंचायत, चलो वार्ड’ अभियान

श्री चक्रधर स्वामी यांचा अवतार दिन देखील विद्यालयात साजरा करण्यात आला. बाराव्या शतकात महानुभाव पंथाचे प्रवर्तक श्री चक्रधर स्वामी यांनी केलेल्या सामाजिक परिवर्तनाने धर्मशास्त्र व साहित्याची दारे समाजातील उपेक्षितांसाठी खुली झाली. त्यामुळे श्री चक्रधर स्वामी यांना समतेचे आद्य प्रवर्तक देखील म्हटले जाते. त्यांनी आपले संपूर्ण जीवन ज्ञानदानाच्या पवित्र कामात खर्ची घातले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी शिक्षकांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार सांस्कृतिक मंडळाने मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री दिगंबर शेळके होते. व्यासपीठावर श्रीमती सुवर्णा पवार, श्री समाधान बिडगर, श्री दत्तू सोनवणे, श्रीमती योगिता जाधव, श्रीमती प्रमिला ठाकरे, श्री विश्वास पाटील, श्री श्रीकांत वाघचौरे श्री सनी गायकवाड, श्री किरण उघडे, श्री किशोर शिंदे. कु. साक्षी बाबुराव गांगुर्डे, आदिती गांगुर्डे, आरती गांगुर्डे, श्रेया गांगुर्डे, पूर्वा गांगुर्डे, श्रद्धा गांगुर्डे, प्रांजल गांगुर्डे, प्रांजली गांगुर्डे, वैष्णवी गांगुर्डे, स्नेहल गांगुर्डे, कुमार भगवान जाधव, ओम गांगुर्डे, श्रेयस गांगुर्डे, प्रणव वानखेडे, विशाल बच्छाव, आदित्य माळी उपस्थित होते.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here