Chandwad – Deola | राज्यात नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडली असून, अवघ्या चार ते पाच महिन्यांवर विधानसभा निवणूक ही येऊन ठेपली आहे. या पार्श्वभूमीवर आता चांदवड- देवळा मतदार संघातही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केदा आहेर यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावरून प्रचाराला सुरुवात केल्याचे दिसत आहे. दरम्यान, मागील दोन टर्मपासून डॉ. राहुल आहेर हे चांदवड- देवळा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करत आहेत. पण वास्तविक पाहता दौलतराव आहेर यांच्या शब्दाखातीर केदा आहेर यांनी माघार घेतली आणि राहुल आहेर यांना निवडून आणण्यासाठी मतदार संघात मोठे परिश्रम घेतल्यामुळेच खरंतर राहुल आहेर हे २०१४ च्या निवणुकीत निवणून आले होते.
कारण त्यावेळी राहुल आहेर हे कोण आहेत, हेदेखील मतदार संघातील लोकांना माहीत नव्हते. तर, “केदा आहेर हेच उमेदवार आहेत, असं समजून राहुल आहेरांना मत द्या”, असे आवाहन स्वतः केदा आहेर यांनीच जनतेला केले होते. यानंतर २०१४ ला संधी दिल्यानंतर २०१९ च्या निवडणुकीत राहुल आहेर यांनी स्वखुशीने माघार घेत केदा आहेर यांना संधी देणे गरजेचे होते. मात्र, याहीवेळी त्यांच्या आग्रहासाठी केदा आहेर यांनीच माघार घेतली आणि पुन्हा एकदा राहुल आहेर यांना पाठिंबा देत निवडणूनही आणले. (Chandwad – Deola)
Chandwad – Deola | आहेर समर्थकांचे दावे फोल; चांदवड नाही फक्त देवळा तालुक्यातून ताईंना लीड
Chandwad – Deola | आता दादांनी नानांना साथ द्यावी
दरम्यान, आता हॅटट्रिक करण्याचे स्वप्न बाजूला ठेऊन आणि भावाच्या त्यागाची जाण ठेवत राहुल आहेर यांनीच स्वखुशीने माघार घ्यावी आणि नानांना साथ द्यावी, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. केदा आहेर यांची राजकीय कारकीर्द पहिली तर स्थानिक पासून ते राज्य स्तरापर्यंतही पक्षात त्यांच्या शब्दाला मान आहे. नामको बँकेचे माजी अध्यक्ष, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष, कळवण देवळा शेतकी संघाचे अध्यक्ष, नाफेडचे राज्य संचालक अशी अनेक मनाची पदं त्यांनी भूषविली आहेत. (Chandwad – Deola)
जिल्ह्यात आणि राज्यातही त्यांचे राजकीय आणि वैयक्तिक संबंधही दृढ असून, माणसं जोडण्याचे राजकीय कसब केदा आहेर यांच्याकडे आहे. तर सध्या त्यांना टक्कर देईल असे नेतृत्व तालुक्यात तरी नाही. त्यामुळे नानांना आमदार व्हायचं असून, या निवणुकीत ते उतरणारच अशी चिन्हे आहेत. तरी त्यासाठी त्यांची यंत्रणा देखील सक्रिय झाली असून, “नाना सांगतील ते धोरण अन् नाना बांधतील ते तोरण” अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली आहे. तर, त्यांच्या कार्यकर्त्यांनी सोशल मिडियावर प्रचाराला सुरुवात केल्याचेही दिसत आहे.
नाना विरुद्ध दादा अशी लढत रंगणार का..?
मात्र, याकामी त्यांना विरोधकांचा विरोध कमी अन् घरातूनच जास्त विरोध होण्याची शक्यता असून, विद्यमान आमदार राहुल आहेर यांना या पंचवार्षिकला मंत्रिपदाची आणि हॅटट्रिकची आस लागल्याने ते आमदारपद सोडून भावाच्या पाठीशी उभे राहणार का ? राहुल आहेर नानांची वाट मोकळी करून फुलांचा सडा टाकणार की वाट आडवून काटेरी कुंपण घालणार..? आणि आगामी काळात नाना विरुद्ध दादा अशी लढत चांदवड देवळा मतदार संघात रंगणार का..? हे चित्र आगामी काळात स्पष्ट होईलच. (Chandwad – Deola)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम