Deola | चांदवड-देवळ्याच्या राजकारणाला रंजक वळण; राहुल आहेर उमेदवारी मागे घेण्यावर ठाम

0
134
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा |  चांदवड-देवळा विधानसभा मतदारसंघातून भाजपने विद्यमान आमदार डॉ.राहुल आहेर यांना उमेदवारी जाहीर केली. यानंतर केदा आहेर यांनी आज देवळा येथे बोलावलेल्या महायुती कार्यकर्ता संवाद मेळाव्यात आमदार डॉ.राहुल आहेर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी सांगितले की, “चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघातून आपणास उमेदवारी न देता आपले चुलत बंधू केदा आहेर यांना उमेदवारी द्यावी, अशी भूमिका आपण घेतली असून, हे गेल्या दहा दिवसांपूर्वीच पक्षश्रेष्ठींना चार वेळा सांगून व त्यांची परवानगी घेऊनच आपण पत्रकार परिषद घेऊन जाहीररित्या माघार घेतली होती.

मात्र, असे असतानाही वरिष्ठांनी आज रविवार (दि.२०) रोजी अचानक आपली उमेदवारी जाहीर केल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. याबाबत आपण केदा आहेर यांच्यासमक्ष पक्षाचे वरिष्ठ नेते गिरीश महाजन यांच्याशी संपर्क साधून आपली भूमिका स्पष्टपणे सांगितली. तसेच आपण याबाबत उद्या सोमवार रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही बैठक लावून आपण आपली भूमिका केदा आहेर यांच्या समक्ष मांडणार आहोत. याबाबत पक्षश्रेष्ठी योग्य तो निर्णय घेतील” असे आमदार डॉ. राहुल आहेर यांनी यावेळी सांगितले.

Deola | विद्यमान आ. डॉ. राहुल आहेरांची चांदवड-देवळा मतदारसंघातून माघार; बंधू केदा अहेरांचा मार्ग मोकळा

Deola | माझा माझ्या भावावर पूर्ण विश्वास – केदा आहेर

चांदवड देवळा विधानसभेच्या जाहीर झालेल्या उमेदवारीवरून भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांनी यावेळी सांगितले की, “पक्षाने जरी डॉ.राहुल आहेर यांना उमेदवारी जाहीर केली असली तरी उद्या सोमवार (दि.२१) रोजी मुंबई येथे डॉ.राहुल आहेर यांच्यासमवेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बैठक लावली असून त्याबाबत डॉ.आहेर हे महायुतीकडून मला उमेदवारी मिळवून देतील. कारण माझा माझ्या पक्षावर आणि माझ्या भावावर पूर्ण विश्वास आहे. भाजप पक्ष माझ्यावर अन्याय करणार नाही व माझा भाऊही माझ्यावर अन्याय होऊ देणार नाही. याची मला पूर्ण खात्री आहे. कार्यकर्त्यांनी संयम पाळावा” असे आवाहन त्यांनी केले. यानंतर तीन दिवसांनी आपण कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन निर्णय घेणार असल्याचे सांगितले. यावेळी मोठ्या संख्येने महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here