Chandwad – Deola | दिंडोरी लोकसभा मतदार संघात शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे यांनी भाजपच्या उमेदवार माजी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचा दारुण पराभव केला. मात्र चांदवड-देवळा मतदार संघात आमदार समर्थकांनी पराभवातही आपले श्रेय शोधले आणि सोशल मिडियावर पोस्ट फिरवत दावा केला की, “डॉ. भारती पवारांचा (bharti pawar) पराभव झाला. तरी चांदवड देवळा मतदारसंघात कांदा उत्पादक शेतकरी नाराज असुनही डॉ. राहुल आहेर (mla rahul aher) यांच्या प्रेमापोटी, कामापोटी, तसेच त्यांचा स्वभाव बघून मतदारांनी भारती पवारांना मतं दिली आणि या मतदार संघांतून पवारांना लीड मिळाले.”
मात्र, वास्तविक पाहता चांदवड-देवळा मतदार संघातून नाहीतर फक्त देवळा तालुक्यातुनच भारती पवारांना २०, ४८१ मतांनी लीड मिळाले आहे. तर, चांदवड तालुक्यात भारती पवारांना पिछाडीवर टाकत भास्कर भगरे हे ३, ७३४ मतांनी आघाडीवर होते. यामुळे आमदार साहेबांमुळे ताईंना मतदार संघातून लीड मिळाले. हे आमदार आहेर समर्थकांचे दावे फोल ठरले आहेत. (Chandwad – Deola)
Chandwad – Deola | दोनच विधानसभा मतदार संघांतून ताईंना लीड
दिंडोरी लोकसभा मतदार संघातील सहाही विधानसभा मतदार संघात महायुतीचे आमदार असूनही भारती पवारांना सहापैकी केवळ नांदगाव आणि चांदवड देवळा या दोनच विधानसभा मतदार संघांतून लीड मिळाले. तर, यातही वास्तविक पाहता चांदवड देवळा विधानसभा मतदार संघातून नाहीतर फक्त देवळा तालुक्यातूनच त्यांना लीड मिळाले आहे आणि तेही केदा आहेर यांच्यामुळे. भाजपच्या नेत्यांनी केदा आहेर (keda aher)यांची मनधरणी केली आणि मतदानाच्या दोन दिवसांपूर्वी ते मैदानात उतरल्यामुळे हे शक्य झाले.
केदा आहेर यांची नाराजी का..?
नाशिक लोकसभा मतदार संघ आपल्याकडे घ्यावा. यासाठी जिल्ह्यातील भाजप नेते आग्रही होते. तर, त्यांच्याकडून भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांचे नाव सुचवण्यात आले होते. मात्र, त्यांच्या नावाचा विचार न झाल्याने केदा आहेर आणि त्यांचे समर्थक नाराज असल्याची चर्चा होती.(Chandwad – Deola) तसेच एकूणच भारती पवारांच्या गेल्या पाच वर्षातील कामगिरी आणि केंद्रात मंत्रीपद असूनही कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी कुठलीही ठोस भूमिका न घेतल्याने, मतदार संघातील कमी दौरे, विरोधातील वातावरण यामुळे पराभवाची चाहूल केदा आहेर यांना लागल्याने विरोध असूनही भारती पवारांना उमेदवारी दिल्यामुळे केदा आहेर हे नाराज होते.
या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे देवळा दौऱ्यावर असताना, मंत्री गिरिश महाजन आणि देवेंद्र फडणवीस हे भारती पवारांच्या प्रचारार्थ मतदार संघात आले असता या दिग्गज नेत्यांनी केदा आहेर यांची मनधरणी केली आणि अखेरच्या दोन दिवसांत केदा आहेर मैदानात उतरल्यामुळेच भारती पवारांना देवळ्यातून लीड मिळाली. कारण जर आमदारांमुळे ही लीड मिळाली असती. तर, ती चांदवड तालुक्यातूनही मिळाली असती. मात्र, ही वस्तुस्थिती नाकारून आमदार समर्थक पराभवातही आपल्याला कसे श्रेय घेता येईल आणि यातून केदा आहेर यांच्यापेक्षा आ. राहुल आहेर हेच कसे उजवे आहेत हेच दाखवण्यात व्यस्त आहेत. तर, यावरून देवळा तालुक्यात केदा आहेर यांची ताकद तुलनेने जास्त असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम