BJP Politics | ‘शिंदेंना केंद्रात आणा, ऐकले नाही तर…’; मुख्यमंत्री पदावरून एनडीएच्या केंद्रीय मंत्र्याचे मोठे विधान

0
54
#image_title

BJP Politics | निवडणुकीच्या निकालानंतर राज्यामध्ये आता नव्या सरकारचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार यावरून जोरदार हालचालींना सुरुवात झाली असून एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सोपविला आहे. आता पुढचा मुख्यमंत्री कोण होणार यावरून शिवसेना व भाजपामध्ये रस्सीखेच पाहायला मिळत असून अशातच एनडीएचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या वक्तव्याने लक्ष वेधले आहे.

BJP Politics | निवडणुकीपूर्वीच भाजपला नंदुरबार मधून फटका; माजी खासदार डॉ. हिना गावितांचा भाजपला रामराम

काय म्हणाले रामदास आठवले? 

“एकनाथ शिंदे यांनी चांगलं काम केलं आहे. त्यांना केंद्रात आणा. ते ऐकले नाहीत तर भाजपाने शिवसेनेला बाजूला सारत अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करावे.” असे म्हटले आहे. शिंदे यांनी गेली अडीच वर्षे चांगले काम केले आहे. ज्यामुळे त्यांनी केंद्रात यावे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री करावे” असे आठवले म्हणाले आहेत.

BJP Politics | भाजपची दुसरी यादी जाहीर; नाशिक मध्यचा तिढा सुटला!

एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री व्हावे शिवसेनेच्या नेत्यांची मागणी

एकनाथ शिंदे यांनी आज देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला असून विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आज तीन दिवस झाले असूनही महायुतीचा मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत अजूनही ठरत नसल्याने चर्चांना उधाण आले आहे. तर सर्वात जास्त जागा मिळवत भाजप हा राज्यातील मोठा पक्ष ठरला असल्यामुळे भाजपला मुख्यमंत्री पद हवे आहे. फडणवीस यांच्या नावाला अजित पवारांनी देखील संमती दिली असून शिंदे सेनेत मात्र कुरबुरी सुरू आहेत. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली चांगल्या योजना आल्या असून त्यांना मोठे यश मिळाले. यामुळे महायुती एवढी चांगली कामगिरी बजावू शकली. तेव्हा शिंदेंनाच मुख्यमंत्री करावे असे शिवसेनेच्या नेत्यांचे म्हणणे आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here