BJP Political | राज्यामध्ये बहुमताने विजय मिळवल्यानंतर महायुतीमध्ये सध्या नव्या सरकारच्या स्थापनेसाठी हालचाली सुरू असून नुकतीच पत्रकार परिषद घेत काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी त्यांनी महायुतीला पाठिंबा देत, “महायुती म्हणून जो काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल.” असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाची वाट मोकळी केली आहे. अशातच नागपूरमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेत शिंदेंच्या भूमिकेचे स्वागत केले आहे.
BJP Political | वाचाळवीरांनी भाजपची डोकेदुखी वाढवली; माजी आमदाराची जीभ घसरली
काय म्हणाले बावनकुळे?
यावेळी बोलताना त्यांनी सर्वप्रथम शिंदे यांच्या निर्णयाचे स्वागत केले. “विरोधकांकडून एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या वावड्या उठवल्या जात होत्या. परंतु एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेतून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या तोंडाच्या वाफा वाफाच राहिल्या” असे म्हणत विरोधकांना टोला लगावला.
पुढे बोलत, “महायुतीच्या सरकारसाठी शिंदे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. महायुती सरकारने अनेक चांगल्या योजना राबवल्या आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासारखा कणखर मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला. महायुती म्हणून शिंदे यांनी आज घेतलेली भूमिका खूप मोठी आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस, अजित पवारांची साथ घेऊन शिंदे यांनी चांगले काम केले आहे. एकनाथ शिंदे यांनी महायुती म्हणून विकासाला न्याय दिला आहे. एकनाथ शिंदे यांनी लढून महायुतीचे सरकार बनवले.” असं म्हणत त्यांनी एकनाथ शिंदें यांचे कौतुक केले.
BJP Political | भाजपकडून बंडखोरांची हकालपट्टी; पक्ष शिस्तीचा भंग केल्याप्रकरणी केली कारवाई
महाविकास आघाडीवर तोफ डागली
तसेच, “शिंदे यानी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचे म्हणणं कधीच नाकारले नाही. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री बोलत असतात, आमची लढाई मुख्यमंत्रीपदासाठी नाही. तर 14 कोटी महाराष्ट्रातील जनतेच्या विकासासाठी आहे. महाविकास आघाडीकडून तीन मुख्यमंत्री जाहीर झाले होते.” असं म्हणत महाविकास आघाडीवरही त्यांनी यावेळी निशाणा साधला.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम