भाजपची शिंदे गटाला उपमुख्यमंत्री पदासह तब्बल 17 मंत्रीपदांची ऑफर?


द पॉईंट नाऊ ब्युरो : एक मोठी बातमी हाती येते आहे. भाजपने शिंदे गटाला तब्बल 17 मंत्रिपद आणि 6 महामंडळाची ऑफर दिल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे आता महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन रंग चढणार अशी चिन्हे दिसत आहेत.

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे महाविकास आघाडी सरकार संकटात आले आहे. शिवसेनेमधून बाहेर पडलेल्या शिंदे गटाने तर आपल्या पक्षाचे नाव ठरवून पाठिंबा काढायचं निश्चित देखील केल्याचं सांगण्यात येतंय.

त्यात आता भाजपने शिंदे गटाला भाजपने मोठी ऑफर दिल्याचे सांगण्यात येत आहे. शिंदे यांच्या गटाला उपमुख्यमंत्री पदासह 17 मंत्रीपदे, 6 महामंडळ अशी ऑफर दिल्याचे सांगण्यात येत आहे.

शिंदे गटाने केलेले बंड हे भाजपमुळेच आहे. शिंदे लवकरच भाजपमध्ये जातील अशी चर्चा रंगू लागली होती. मात्र एकनाथ शिंदे यांनी हे फेटाळून लावले. भाजपच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. आणि आता ही मंत्रीपदांची देण्यात आलेली ऑफर चर्चेत आली आहे. आता खरे काय ते चित्र लवकरच स्पष्ट होईल असे दिसून येत आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Leave a Comment

Don`t copy text!