Big News | महाराष्ट्रात सध्या फुटीचं राजकारण सुरु असल्याचं दिसून येत आहे. पहिले आताचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडत भाजपासोबत सत्ता स्थापन करत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांनतर आणखी एक पक्षफुट राज्यात जोरदार गाजली ती म्हणजे राष्ट्रवादी पक्षातून अजित पवार हे बाहेर पडत ते भाजप आणि शिंदे गटासोबत सत्त्तेमध्ये सहभागी झाले. गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात पवार घराण्याचा दबदबा आहे.
दरम्यान, सध्या पवार घराण्यातील चौथी पिढी ही राजकारणात सक्रिय असून शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे, पुतणे अजित पवार आणि नातू रोहित पवार तसेच पार्थ पवार हे राजकारणात चांगलेच सक्रिय आहेत. आता एक मोठी माहीती समोर येत असून पवार घराण्यातील आणखी एक वारसदार राजकारणात येणार असल्याची चर्चा राज्यात चांगलीच रंगली आहे.
Big News – पवार घराण्यातील आणखी कोणता वारसदार राजकारणात येणार ?
मिळालेल्या माहीतीनुसार, अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव आता राजकारणात येणार असल्याची चर्चा राज्यात चांगलीच रंगत आहे. विशेष म्हणजे श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव हे कोणत्या गटात जाणार असा सवाल उपस्थित होत असताना श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव अजित पवार गटात जाणार असं वाटत होतं मात्र श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव युगेंद्र पवार हे राजकारणात आजोबांना साथ देणार आहेत.
मग अचानक हा वारसदार राजकारणात येण्यामागे कारण काय? असा सवाल उपस्थित होत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव युगेंद्र पवार ह्यांनी शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने बारामतीत कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलं असून या स्पर्धेचे बारामतीत बॅनरबाजी करण्यात आली आहे. त्यावर शरद पवार आणि युगेंद्र पवार असे दोघांचे फोटो असल्याने युगेंद्र पवार हे राजकारणात सक्रिय होणार असल्याची चर्चा रंगत आहे.
जरांगे इशारा सभा | आश्वासनं खूप झालीत आता…; इशारा सभेत जरांगेची तोफ काडाडणार
युगेंद्र पवार नेमके आहेत कोण ?
गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात पवार घराण्याचा दबदबा आहे. यातच आता पवार घराण्यातील नवा वारसदार राजकारणात येणार अशी चर्चा सुरू असून युगेंद्र पवार हे ज्येष्ट नेते शरद पवार यांचे नातू आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांचे ते चिरंजीव असून युगेंद्र पवार हे चांगले संघटक असल्याचं म्हटलं जातं. तरुणांना राजकारणात आणण्यासाठी युगेंद्र पवार यांचे नेहमीच प्रयत्न दिसून येत असतात तसेच युगेंद्र पवार शरयू अॅग्रोचे ते सीईओही आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम