Onion Rate | लासलगावात लाल कांद्याच्या दरात मोठी वाढ; असे आहेत दर

0
26

Onion Rate |  लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बारा दिवसांच्या सुट्टीनंतर सोमवारी (दि. २०) रोजी लाल कांद्याच्या दरांत सरासरी सोळाशे रुपयांनी वाढ झाली आहे. पण, त्याचवेळी दुसरीकडे उन्हाळ कांद्याच्या दरांत दोनशे रुपयांची घसरण झाली आहे.

उन्हाळ कांद्याला कमाल ४,५४५ रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे तर, लाल कांद्याचा भाव हा प्रति क्विंटलला ४,१०१ रुपये असा आहे.

नाशिक जिल्ह्यातील विंचूर उपबाजार वगळता सर्वच बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव हा बंद होता. ऐन सणासुदीत पैशांची गरज असताना लिलाव बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना कांदा विक्रीसाठी अडचण झाली होती.

Nashik news | शिव महापुराण कथेच्या पार्श्वभूमीवर वाहतूक मार्गात मोठे बदल

६ नोव्हेंबर रोजी लासलगाव बाजार समितीमध्ये लिलाव झाले असताना, उन्हाळ कांद्याला कमाल चार हजार रुपये तर, लाल कांद्याला कमाल तीन हजार ५०१ रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला होता. ६ नोव्हेंबरच्या तुलनेत काल कांद्याच्या कमाल भावात ५०० ते ६०० रुपयांची तेजी दिसून आली.

दरम्यान, सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता लाल कांद्याची नवी आवक वाढल्याने कांद्याचे पूजन कांदा व्यापारी वृषभ राका, बाजार समितीचे संचालक प्रवीण कदम, बाळासाहेब दराडे आणि दत्तात्रय खाडे, संदीप गोमासे यांच्या हस्ते करण्यात आले होते.

असे आहेत कांद्याचे भाव

(दहा हजार ९८८ क्विंटल आवक)

– उन्हाळ कांदा : किमान- एक हजार ५११ प्रति क्विंटल, कमाल- चार हजार ५४५ प्रति क्विंटल , सरासरी- चार हजार प्रति क्विंटल

– लाल : किमान- दोन हजार प्रति क्विंटल, कमाल- चार हजार १०१ प्रति क्विंटल, सरासरी- तीन हजार ३०० प्रति क्विंटल.

IND vs AUS Final | तुम्ही मटन खाल्लं म्हणून भारत हरला; म्हणत भावाची हत्या तर, वडिलांवरही हल्ला


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here