Chhagan Bhujbal | मराठा ओबीसीत फुट पाडण्याचा भुजबळांचा डाव..?

0
24

Chhagan Bhujbal |  राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे बीड दौऱ्यावर जाणार आहेत. बीडमध्ये समता परिषदेचे कार्यकर्ते सुभाष राऊत यांचं पंचातारांकित हॉटेल जाळलं होतं. त्या हॉटेलची भुजबळ पाहणी करणार आहेत. तसेच माजी आमदार जयदत्त क्षीरसागर तसेच विद्यमान आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरांनाही आग लावली गेली होती. त्याची पाहणी व विचारपुसही भुजबळ करणार आहेत. त्यामुळे या दौऱ्याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसींमध्ये मराठ्यांचा समावेश करावा तसेच मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. मात्र, त्यामुळे ओबीसी समाजात प्राचनाड अशांतता पसरली होती. ओबीसी नेत्यांनी मराठा समाजाला ओबीसीत घेण्याला कडकडून विरोध केला होता.

मराठा आरक्षणासाठी २४ तासांत चौघांची आत्महत्या; मराठा आंदोलन आणखी तीव्र होणार?

मराठा समाज आरक्षणात आला तर ओबीसी आरक्षणाचा टक्का कमी होईल अशी भीती ओबीसी नेत्यांना होती.  त्यामुळे माराठ्यांचा ओबीसींत समावेश करू नये, यासाठी ओबीसींनीही उपोषण सुरू केलं होतं. दरम्यान, आता या वादात पुन्हा ठिणगी पेटली आहे. मंत्री छगन भुजबळ यांची एका कार्यकर्त्यासोबत बोलतानाची एक कथित ऑडिओ क्लिप समोर आली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये भुजबळ कार्यकर्त्यांना करो या मरोचा सल्ला देत आहे.

काय आहे क्लिप?

या ऑडिओ क्लिपमध्ये भुजबळ बोलत आहेत की, “काय नाही ती सगळी मंडळी आलेली आहेत. तर,आपण आवाज उठवायला पाहिजे. मी म्हणतो आवाज उठवा. एकटा मी तर कुठपर्यंत लढणार? प्रत्येक गावागावात ज्या पद्धतीने त्यांचे बुलडोजर चाललेले आहेत, त्यात आता ओबीसी काही वाचणार नाही. आपण आता “करेंगे या मरेंगे” हेच करायला पाहिजे. आवाज उठवायला पाहिजे. असंही मरतंय आणि तसंही मरतंयच. त्यांचं सगळं झालं आहे. मी आता उभा राहतो, असं छगन भुजबळ यात बोलत आहेत.

त्यावर कार्यकर्ता म्हणतो, हो साहेब, त्यांनी आता फॅमिली घेतली म्हणजे सर्व आलेच आरक्षणात. साहेब तुम्ही निर्णय घ्या, आम्ही आहोत तुमच्यासोबत, यावर भुजबळ म्हणतात, सगळं झालं सगळं झालं. मी स्वतः उभा राहतो आता.

Deola | कॉंग्रेसच्या उपोषणाला वाढता प्रतिसाद; अनेकांनी उपोषण स्थळी भेट देऊन पाठिंबा केला जाहीर

भुजबळ बीडमध्ये… 

दरम्यान, मराठा आरक्षणाचा वणवा आता कुठे शांत झाल्यानंतर राज्याचे मंत्री छगन भुजबळ हे आज बीडच्या दौऱ्यावर जाणार आहेत. छगन भुजबळांच्या समता परिषदेचे बीडचे मुख्य पदाधिकारी सुभाष राऊत यांचं सनराईज हे पंचतारांकित हॉटेल आंदोलकांकडून पेटवण्यात आलं होतं. दरम्यान, ते हॉटेलची पाहणी करणार आहेत. त्यासोबतच बीड येथे झालेल्या हिंसाचारात जयदत्त क्षीरसागर व प्रकाश सोळंके यांचं घर पेटवलं होतं त्यांचीही भेट घेत ते विचारपूस करणार आहेत.

छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांना सभेसाठी ऐवढी आर्थिक मदत कुठून येते?. असा सवाल केला होता? त्यामुळे त्यांना मराठा समाजाकडून अनेक धमक्या येत होत्या आणि आता उद्या हेच भुजबळ बीड जिल्ह्याच्या दौऱ्याला जाणार आहे. त्यांच्या ह्या दौऱ्याला मराठा समाजाचा विरोध होणार का? की ह्या दौऱ्याला त्यांच्या ह्या व्हायरल क्लिपमुळे काही गालबोट लागेल हे बघण महत्त्वाच असणार आहे.

Breaking News । एकनाथ खडसेंना हृदयविकाराचा झटका; तातडीने मुंबईला हलविणार


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here