Bharat Ratna | …तर बाळासाहेब ठाकरेंनाही भारतरत्न जाहीर करावा

0
29
Bharat Ratna
Bharat Ratna

Bharat Ratna |  भारत सरकारने ‘भारत रत्न’ पुरस्कारांची घोषणा केली असून, या पार्श्वभूमीवर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक मागणी केली आहे. दरम्यान, केंद्र सरकारने शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांनाही भारतरत्न पुस्कार घोषित करण्याची मागणी राज ठाकरे यांनी केली आहे. याबाबत राज ठाकरे यांनी ट्विट केले असून, यात राज ठाकरे म्हटले आहे की,”माजी पंतप्रधान स्व. पी.व्ही. नरसिंहराव, स्व. चौधरी चरण सिंह व भारतीय हरित क्रांतीचे जनक एस. स्वामिनाथन यांना ‘भारतरत्न’ हा सन्मान घोषित करण्यात आला. या यादीतील एस.स्वामिनाथन ह्यांचे अवघ्या काही महिन्यांपूर्वीच निधन झालं असून, इतकी अफाट कामगिरी करणाऱ्या या शास्त्रज्ञाला ते हयात असतानाच हा बहुमान मिळायला हवा होता.(Bharat Ratna)

असो, बाकी आता पी.व्ही नरसिंहराव व चौधरी चरण सिंह ह्यांना व काही वर्षांपूर्वी प्रणब मुखर्जींनाही भारतरत्न सन्मान घोषित करून, भारतीय जनता पक्ष प्रणित केंद्र सरकारने राजकीय औदार्य दाखवलंच आहे. तर मग हेच औदार्य आता त्यांनी हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या बाबतीतही ‘भारतरत्न’ घोषित करून दाखवायलाच हवं.

Abhishek Ghosalkar | ‘चौकशीतून अनेक गोष्टी समोर आल्या’; काय म्हणाले फडणवीस..?

देशातील एक प्रख्यात व्यंगचित्रकार तसेच देशातील तमाम हिंदूंची अस्मिता जागृत करणाऱ्या या अद्वितीय नेत्याला हा बहुमान मिळायलाच हवा. स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा वारसा ज्यांच्याकडे आला आहे. अशा माझ्यासारख्या अनेक जणांसाठी तो अत्यानंदाचा क्षण असेल.”, असे ट्विट राज ठाकरे यांनी केले आहे. दरम्यान, आता राज ठाकरे यांची ही मागणी सरकार मान्य करेल का? हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.(Bharat Ratna)

शुक्रवारी केंद्र सरकारने आणखी तीन जणांना भारतरत्न पुरस्कार जाहीर केला आहे. यात कृषी क्षेत्रात अभूतपूर्व योगदान देणारे देशाचे माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग, तसेच माजी पंतप्रधान नरसिंह राव व भारतीय हरित क्रांतीचे जनक डॉ. एम. एस स्वामीनाथन यांचा समावेश करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने अटलबिहारी वाजपेयी व कर्पुरी ठाकूर यांनाही भारतरत्न पुरस्कार जाहीर केलेला होता.(Bharat Ratna)

Abhishek Ghosalkar | चालू फेसबूक लाईव्ह मध्ये ठाकरेंच्या नगरसेवकाला घातल्या गोळ्या

Bharat Ratna | …अन् इंडिया आघाडीत फूट

शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांना भारतरत्न पुस्कार जाहीर केला व त्यांच्याविषयी गौरवोद्गार काढले. माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांनी त्यांचे पूर्ण आयुष्य हे देशातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी समर्पित केले होते. त्यांनी राष्ट्र उभारणीला नेहमीच गती दिली. त्यांचे शेतकरी बंधू आणि भगिनींप्रती असलेले समर्पण तसेच लोकशाहीप्रती असलेली त्यांची बांधिलकी ही संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी आहे, अशी भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटद्वारे व्यक्त केली.(Bharat Ratna)

त्यावर चौधरी चरणसिंग यांचे नातू जयंत चौधरी यांनी प्रतिक्रिया दिली असून ते म्हणाले की,”या पुरस्काराबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे मनापासून आभार मानतो. पंतप्रधानांनी देशाची नस ओळखली. मी आता कुठल्या तोंडाने एनडीएमध्ये सामील होण्याचा प्रस्ताव नाकारू?, असा प्रतिप्रश्न यावेळी जयंत चौधरी यांनी केला. त्यामुळे याता ऐन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एनडीएत सामील होण्याची दाट शक्यता आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here