देवळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदी भाग्यश्री पवार तर उपनगराध्यक्ष पदी मनोज राजाराम आहेर बिनविरोध

0
84

सोमनाथ जगताप-प्रतिनिधी : देवळा | देवळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदी भाजपच्या भाग्यश्री अतुल पवार यांची तर उपनगराध्यक्ष पदी मनोज राजाराम आहेर यांची बिनविरोध निवड झाली आहे. मावळत्या नगराध्यक्षा सुलभा आहेर, उपनगराध्यक्ष अशोक आहेर यांनी आवर्तन पद्धतीनुसार राजीनामा दिला आहे. ह्या रिक्त पदांच्या जागेसाठी सोमवारी (दि. ६) सकाळी ११ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली देवळा नगरपंचायत सभागृहात नगरसेवकांची बैठक घेण्यात आली.

देवळा | मेशी ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच पदी शिवसेनेचे (उबाठा) तालुका प्रमुख बापू जाधव विजयी

यावेळी नगराध्यक्ष पदासाठी भाग्यश्री पवार यांना सूचक म्हणून जितेंद्र आहेर आणि अनुमोदन म्हणून अशोक आहेर यांनी स्वाक्षरी केली. तर उपनगराध्यक्ष पदासाठी मनोज राजाराम आहेर यांना सूचक म्हणून संजय आहेर यांनी तर अनुमोदन म्हणून कैलास पवार यांनी स्वाक्षरी केली. नगराध्यक्ष पदासाठी भाग्यश्री पवार आणि उपनगराध्यक्ष पदासाठी मनोज आहेर यांचे एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी विजय सूर्यवंशी यांनी त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले आहे.

याप्रसंगी माजी नगराध्यक्षा सुलभा आहेर, माजी उपनगराध्यक्ष अशोक आहेर नगरसेवक जितेंद्र आहेर, संजय आहेर, भारती आहेर, शीला आहेर, कैलास पवार, राखी भिलोरे, करण आहेर, रत्ना मेतकर, एशवर्या आहेर, भूषण गांगुर्डे, अश्विनी चौधरी, सुनंदा आहेर, संतोष शिंदे, योगेश आहे,  हितेश आहेर, मुख्याधिकारी श्यामकांत जाधव आदींसह कर्मचारी उपस्थित होते.

आमदार महेश शिंदे यांचे कोरेगाव विधानसभा मतदार संघातील बहुतांशी ग्रामपंचायतवर वर्चस्व

नगराध्यक्ष पदी भाग्यश्री पवार आणि उपनगराध्यक्ष मनोज आहेर यांची निवड घोषित होताच त्यांच्या समर्थकांनी पाचकंदिल शिवस्मारक परिसरात फटाक्यांची आतिषबाजी आणि गुलालाची उधळण करत एकच जल्लोष साजरा केला. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी येथील छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. नूतन पदाधिकाऱ्यांचे आमदार डॉ. राहुल आहेर, भाजपचे जिल्हा नेते केदा नाना आहेर, बाजार समितीचे संचालक भाऊसाहेब पगार,  माजी नगराध्यक्षा धनश्री आहेर, डॉ कोमल निकम, डॉ प्रशांत निकम, ‘देमको’च्या चेअरमन कोमल कोठावदे, योगेश वाघमारे, युवराज आहेर, हर्षद भामरे आदींसह सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here