सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | संपूर्ण देवळा तालुक्याचे लक्ष लागलेल्या मेशी ग्रामपंचातीच्या सार्वत्रिक निवडणुकीत अतिशय अटीतटीच्या झालेल्या लढतीत थेट सरपंच पदी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे तालुका प्रमुख बापूसाहेब शांताराम जाधव हे सर्वाधिक १ हजार १३९ मतांनी विजयी झाले आहेत. या ग्रामपंचातीच्या थेट सरपंच पदासाठी एकूण पाच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे ठाकलेले होते. या अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे देवळा तालुका प्रमुख बापूसाहेब शांताराम जाधव विजयी झाले.
Agriculture | हिवाळ्यात करा ह्या भाज्यांची लागवड; आणि मिळवा भरघोस उत्पन्न
उर्वरित प्रभागात विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे-
वार्ड क्रमांक २ – योगेश चव्हाण (मते – २३२ विजयी ), शिल्पा अहिरे (मते – २४५ विजयी), सतीश अंबादास बोरसे (मते – ५२४ विजयी ),
वार्ड क्रमांक ३ – समाधान चिंतामण गरुड (मते – २८६ विजयी ), द्वारकाबाई सुभाष शिरसाठ (मते – २८२ विजयी)
वार्ड क्रमांक ४ – शाहू गंगाधर शिरसाठ (मते – ३६४ विजयी), मनीषा कुवर (मते – ३०५ विजयी),
वार्ड क्रमांक ५ – गोरख बोरसे (मते – २६९विजयी ), तुषार शिरसाठ (मते – २२५ विजयी)
तर माघारीच्या दिवशी अनिता शिरसाट, दगूबाई शिरसाट, लीलाबाई चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली आहे.
Crime News | आईचा डोळा लागला आणि १० महिन्याच्या बाळाचा पाण्याच्या बादलीत बुडून मृत्यू
विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी मतमोजणी केंद्राबाहेर गुलालाची उधळण करीत एकच जल्लोष
मेशी ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच पदाचे उमेदवार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजेंद्र शिरसाट तसेच वार्ड क्रमांक ५ मधील सदस्य पदाचे भाजपचे पंचायत समितीचे माजी सभापती केदा शिरसाठ यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. थेट सरपंच पदी शिवसेनेचे (उबाठा) तालुका प्रमुख बापुसाहेब जाधव, तर सदस्य पदाचे उमेदवार देवळा बाजार समितीचे संचालक शाहू शिरसाठ, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष तुषार शिरसाठ विजयी झाले आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम