अतिवृष्टीग्रस्तांना शिंदेंचा दिलासा ; 501 कोटींचा निधी जिल्ह्यांना वितरीत

0
23
Assam flood situation turns critical
आसाममध्ये पुराचा कहर, अतिवृष्टीमुळे १० हजारांहून अधिक लोक बेघर

नाशिक: शेतकऱ्यांना अवकाळी व अतिृष्टीने झोडपले असताना तूर्तास राज्य सरकारने बळीराजाला दिलासा दिला आहे. जून, जुलै, ऑगस्ट 2022 मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेती पिकांचे व शेतजमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भामध्ये अतिवृष्टीग्रस्तांना वाढीव मदत केली जाईल असे आश्वसन दिले होते. मात्र निर्णय मात्र होत नव्हता.

नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला होता. राज्यातील ठिकठिकाणच्या पूरग्रस्तांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी कुणाही नुकसानग्रस्तास वाऱ्यावर सोडणार नाही म्हणत दिलासा दिला होता सरकर कधी निर्णय जाहीर करते याकडे लक्ष लागून होते.

आज राज्य आपत्ती प्रतिसाद निधी आणि राज्य शासनाच्या निधीतून एकत्रित 3 हजार 501 कोटी निधी जिल्ह्यांना देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. मदत व पुनर्वसन विभागाने तसा शासन निर्णय आज जारी केला आहे

वाढीव मदतीप्रमाणे जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी 13600 प्रति हेक्टर तर बागायत पिकांसाठी 27 हजार रुपये प्रति हेक्टररुपये अनुदान व बहुवार्षिक पिकांसाठी 36 हजार रुपये प्रति हेक्टर अशी तीन हेक्टर मर्यादेपर्यंत मदत देण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here