Arvind Kejriwal : कथित मद्य घोटाळा प्रकरणी तिहार तुरुंगात असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरिवाल (Arvind Kejriwal) यांच्या आरोग्याबाबत आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी तिहार तुरुंग प्रशासनावर काही आरोप केले आहेत. तिहार तुरुंगात (Tihar Jail) केजरिवाल यांची शुगर लेव्हल अनेक वेळा खाली गेली असून, शुगर लेव्हल कमी झाल्यामुळे केजरीवाल झोपेत असताना कोमामध्ये जाऊ शकतात किंवा त्यांना ब्रेन स्ट्रोकचा धोकाही निर्माण होऊ शकतो, असा दावा खासदार संजय सिंह यांनी केला आहे. (Arvind Kejriwal)
गेल्या अनेक दिवसांपासून आम आदमी पार्टीच्या नेत्यांकडून तिहार जेलमध्ये असताना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचं वजन तब्बल 8.5 किलोने कमी झाले असल्याचा दावा वारंवार केला जात असून, याबाबत तिहार कारागृहाच्या अधीक्षकांनी दिल्ली सरकारच्या गृह विभागाला पत्र लिहिले आणि यात त्यांनी केजरिवाल यांच्या वजनाबाबत माहिती दिली आहे. (Arvind Kejriwal)
Arvind Kejriwal | सर्वांना एकदाच अटक करा; भाजप मुख्यालयासमोर उद्या ‘जेल भरो’
Arvind Kejriwal | केजरीवाल यांचं वजन खरंच घटलं?
तुरुंग अधिक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, अरविंद केजरीवाल हे 1 एप्रिल 2024 रोजी ज्यावेळी पहिल्यांदा तिहार जेलमध्ये आले होते. त्यावेळी त्यांचं वजन हे 65 किलो इतकं होतं. त्यानंतर केजरीवाल हे 10 मे रोजी तिहार कारागृहातून बाहेर पडले. त्यावेळी त्यांचं वजन हे जवळपास 64 किलो होतं. पुन्हा 2 जून रोजी त्यांनी तुरुंगात आत्मसमर्पण केले त्यावेळी त्याचं वजन हे 63.5 किलो असून, सध्या त्यांचं वजन 61.5 किलो इतकं आहे. (Arvind Kejriwal)
कमी प्रमाणात जेवल्यामुळे किंवा कमी कॅलरी घेतल्यामुळेही वजन कमी होऊ शकतं. अरविंद केजरीवाल यांची वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली दररोज वैद्यकीय तपासणी केली जात असून, तसेच त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल याही न्यायालयाच्या आदेशाने वैद्यकीय मंडळासोबत सल्लामसलत करते वेळी उपस्थित राहतात.
आप नेत्यांचे आरोप बिनबुडाचे
दरम्यान, अरविंद केजरिवाल यांच्या वजनाबाबत दिल्ली सरकारचे काही मंत्री, एक विद्यमान खासदार व आम आदमी पक्षाचे आमदार आणि नेत्यांकडून सोशल मीडिया किंवा इतर माध्यमांद्वारे हे आरोप करण्यात आले होते. तर, हे आरोप बिनबुडाचे असून, खोटी माहिती पसरवून तिहार तुरुंग प्रशासनाला घाबरवण्याच्या व राज्यातील तसेच देशातील जनतेची दिशाभूल करण्याच्या उद्देशानं हा प्रयत्न करण्यात आल्याचेही या पत्रात म्हटले आहे. (Arvind Kejriwal)
Arvind Kejriwal | केजरीवाल तुरुंगातून राजधानीचा कारभार चालवणार
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम