शेती करायला लागल्यावर माणूस काळानुसार व गरजेनुसार त्यातील सुधारणांसाठी प्रयत्न करू लागला. विविध खतं, बियाणं तयार करणे, प्राण्यांची विष्ठा खत म्हणून वापरणे, शेळीला शेतात बसवणं. यांसारख्या गोष्टी शेकडो वर्षे चालू होत्या, पण जर्मन शास्त्रज्ञ वोन लिबिग त्यांनी १८३९ साली कृत्रिम खत (Artificial fertilizer) किंवा रासायनिक खत बनवण्याचा प्रयत्न केला.
त्यांच म्हणणं होतं की, प्राण्यांच्या शरीराचा भाग किंवा विष्ठा आणि इतर काही पदार्थ एकत्र केल्यास त्यातून वनस्पतीला आवश्यक असे खनिजे मिळू शकतील. कोणत्या वनस्पतीला कोणते खनिज (Artificial fertilizer) आवश्यक आहे. यावर मात्र संशोधन करावे लागेल. त्यामुळेच त्याने बरेच असे संशोधन व प्रयोग केले. त्यांच म्हणणं असं होतं की, झाडांना किंवा वनस्पतीला कार्बन आणि नायट्रोजन वातावरणातून मिळतो, पण जर प्राण्यांची कातडी आणि शरीर कुजवल्यानंतर अमोनिया आणि कार्बन मुक्त होऊन ते वातावरणात जातील अशी त्याची थेअरी होती.
हे सुद्धा वाचा :
कांद्याच्या अनुदानासाठी राज्य सरकारने केंद्राकडे अद्याप प्रस्ताव पाठवला नाही ; ना डॉ भारती पवार
प्रत्यक्षात त्यांने सुरुवातीचे जे प्रयोग केले ते फसले. याचं कारण पाण्यात विरघळणाऱ्या अल्कलीच्या संयुगांचा वापर करून त्याने खत तयार केले होते, जे पावसाने धुऊन गेलं. त्यानंतर त्याने जे खत विकसित केलं त्याला आपण आता रासायनिक खत किंवा कृत्रिम खत(Artificial fertilizer) म्हणतो.
मात्र, कृत्रिम खतांच्या अतिरेकी वापरामुळे जमिनीतील क्षार वाढून शेतीचं नुकसान होतंय हे कळायला माणसाला बराच काळ जावा लागला. आपल्याकडे हरित क्रांतीनंतर खतांचा वापर वाढला, त्यामुळे अनेक ठिकाणी शेती (Artificial fertilizer) ओस पडल्याची उदाहरणे आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम